फोटो : तहसीलदार व बांधकाम विभागाच्या प्रतिनिधी समोर अभ्यासू बाजू मांडताना व्यंकटेश सावंत व उपस्थित ग्रामस्थ.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
लेप ग्रामपंचायतींतील वाघाव, वाघाव बौध्द वाडी, कळकीचा कोंड, गौळवाडी, लेप मुळगांव, आदीवासी वाडी व वांगणी या सर्व गाव-वाडयाना जोडणारा नवशी, वाघाव, लेप हा ग्रामिण मार्ग ३५ रस्ता गेले अनेक वर्षे अपूर्णावस्थेत आहे व ग्रामपंचायत हद्दीचे सुमारे ४ ते ५ कि.मी. परिघांने राज्य मार्ग ९९ व राज्य मार्ग ९१ हे अतीशय सुसज्ज असे रस्ते आहेत. त्याना लेप ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामिण मार्ग ११६ जोडावा या मागणीसाठी बुधवार दिं .३ ऑक्टोबर रोजी पंचक्रोषीतील ग्रामस्थ तहसीलदार कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करणार होती .परंतु तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके व बांधकाम विभागाचे अन्य अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीतुन तुर्त समाधान झाले आसल्याने पंचक्रोषीने लाक्षणिक उपोषण तूर्त स्थगित केल्याचे लेप सरपंच अंकुश खडस यांनी वार्तालाप करताना सांगितले , यावेळी त्यांच्या समवेत माजी जि.प. सदस्य श्रीमती वैशाली सावंत ,माजी सभापती अनिता खडस, व्यंकटेश सावंत, गाव समीतीचे अध्यक्ष विष्णु विचारे, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, उप- अभियंता आनंद गोरे ,जि .प. अभियंता आर. डी.मेंदाड, विशाल पौळकर,चंदन मोरे, एस.एम.बसमते उपस्थीत होते.

Post a Comment