मेंदडी : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील तुरुबाडी - रोहिणी गावाच्यालगत कंपनीचे काम सुरू असल्याने त्या कंपनीच्या मशीन घेऊन जाणार्या भरधाव ट्रेलरची समोरुन येणाच्या एसटीला जोरदार धडक होताना टळली . एसटी चालकाच्या प्रसंगावधनाने एसटीमधील सुमारे ५५ प्रवाशांचे प्राण वाचले . त्यामुळे एसटी प्रवाशांनी काळ आला होता पण वेळ आली नव्हती , असे म्हणून निःश्वास सोडला . मात्र एसटीतील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत . बुधवार २४ ऑक्टोबर रोजी ट्रेलर चालक रामआशिष रामपती यादव हा ट्रेलर क्र . एमएच ४६ एच ५६०२ हा माणगाववरून भरधाव वेगात निघाला असताना मेंदडी वारळ रस्त्याच्या वळणावर समोरून येणारी म्हसळा - वारळ एसटी . क्र . एमएच १४ बीडी २२०८ ला धडकणार होता . परंतु , एसटी चालक ईश्वर बांगर यांनी प्रसंगसावधान राखत एसटी रस्त्याच्या उजव्या बाजूला घेतली . यामुळे एसटीतील ५५ प्रवाशांचे ईश्वर बांगरणे प्राण वाचविले . त्यातील २ विद्यार्थी अलका खारगावकर , जागृती महादाण यांना दुखापत झाली असल्याने त्यांना म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . ट्रेलर चालकाविरोधात म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment