श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाच्या दोन्ही रुग्णवाहिका आजारी ; रुग्ण व नातेवाईक यांना मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड : लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
      श्रीवर्धन तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही रुग्णवाहिका एक महिन्यापासून नादुरूस्त आहेत .गँभिर अपघात व अत्यंत नाजूक स्थितीतील रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचारासाठी इतरत्र दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत .तसेच शहरात कुठेच खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याकारणाने रुग्ण आणि नातेवाईक व यांच्या समोर मोठा पेच प्रसंग निर्माण होत आहे .

 सन2014 मध्ये श्रीवर्धन शहरात करोडो रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालयाची वास्तू निर्माण करण्यात आली .तालुक्यातील जनतेस मोठ्या प्रमाणात दर्जेदार व नियमित आरोग्य  सेवा उपलब्ध होणे अभिप्रेत आहे .   उपजिल्हा रुग्णालयात 50 ( बेड) आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे .त्या साठी 48 कर्मचाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे .वैद्यकीय अधीक्षक एक ,वैद्यकीय अधिकारी 07 ,अधिपरिचरिका12  , परिसेविका 02 ,अधिसेविका 02 ,लिपिक02,औषध निर्माण अधिकारी02,प्रयोगशाळा तज्ज्ञ01 व प्रयोगशाळा साह्यक 01 त्या पैकी वैद्यकीय अधिकारी दोन पदे रिक्त आहेत .
श्रीवर्धन तालुका हा दलणवळणाच्या दृष्टीने अत्यंत अडचणींचा आहे .माणगाव ते श्रीवर्धन 48 किमीचे अंतर पुर्ण करण्यासाठी कमीत कमी दीड दोन तास लागतात .गँभिर व प्राणांतिक अपघात झाल्यास तात्काळ उपचाराची नितांत आवश्यकता भासते .या प्रसंगी मोठ्या रुग्णवाहिकेची आवश्यकता निर्माण होते .108 नंबर ची रुग्णवाहिका श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना सहजासहजी उपलब्ध होत नाही . कारण सदरच्या नंबर वर    अपघात किंबहुना इतर रुग्णांची माहिती कळल्या नंतर दोन तास तरी कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईका कडून समजले .तसेच 108 नंबर च्या रुग्णवाहिका फक्त रायगड जिल्हा च्या हद्दी पर्यंत सेवा देतात जिल्ह्याच्या बाहेर सेवा पुरवण्यात त्या असमर्थता दर्शवत असल्याचे दिसून येत आहे . 102 नंबरची रुग्णवाहिका प्रामुख्याने गर्भवती महिला साठी असते अशी माहिती प्राप्त झाली आहे .
रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत त्यामुळे सर्व सामान्य माणसे रुग्णवाहिके विषयी संताप व्यक्त करत आहेत.  उपजिल्हा रुग्णालयातील दोन पैकी एक रुग्णवाहिका पुणे येथील टाटा कंपनी च्या कार्यशाळेत दुरुस्ती साठी टाकण्यात आली आहे व दुसरी रुग्णवाहिका श्रीवर्धन मधील जसवली येथे दुरुस्ती साठी पाठवली आहे . आजमितीस श्रीवर्धन तालुक्यातीची लोकसंख्या 85040 च्या जवळपास आहे .तालुकात ग्रामीण भाग जास्त आहे .78 गावातील लोक आरोग्य सेवेसाठी उपजिल्हा रुग्णालया वर अवलंबून आहेत अशा परिस्थिती रुग्णानां वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे .श्रीवर्धन तालुक्या व्यतिरिक्त जवळ च्या म्हसळा व माणगाव परिसरातील अनेक रुग्ण उपचारासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात उपचारा साठी येत आहेत .त्यामुळे प्रशासनाने तात्काळ रुग्णवाहिकेचा प्रश्न निकाली काढणे अगत्याचे आहे .

 उपजिल्हा रुग्णालयाच्या दोन्ही रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्यामुळे  दुरुस्ती साठी पाठवल्या आहेत .लवकरच त्या रुग्णांसाठी उपलब्ध होतील .सदरच्या रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होत आहेत त्या संबधी अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवत आहे .
  डॉ मधुकर ढवळे (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन )


पंधरा दिवसा पूर्वी माझा मुलगा दत्ता साळुंखे यांचा अपघात झाला त्या वेळी  उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे  खाजगी वाहनाने  पुढील उपचारांसाठी जावे लागले .तरी लवकरात लवकर श्रीवर्धन रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी .
  विनायक साळुंखे(रहिवाशी श्रीवर्धन )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा