म्हसळा तालुक्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी,लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी


हेमंत पयेर 
म्हसळा तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये,शाळा महाविद्यालयांत स्वच्छता अभियान, व्याख्यान, प्रतिमापूजन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमांतून.राष्ट्रपिता महात्मा गांधी,लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. तहसील कार्यालयात म्हसळा तहसिलदार रामदास झळके यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी नायब तहसिलदार भिंगारे,यांच्या समवेत कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 


सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे माजी सभापति महादेव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय म्हसळाचे अध्यक्ष संजय खांबेटे,निलेश मांदडकर,मनोज नाक्ती,प्रवीण उर्फ बाबू बनकर,अनंत नाक्ती,किशोर मोहिते,श्रवण कोकचा,ग्रंथपाल उदय करडे,सायली चौगुले,धनश्री नाक्ती,निलेश भायदे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रंथालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची चरित्र व विचार दर्शनावर ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले.

रायगड जिल्हा परिषदेच्या आय एस ओ मानांकीत आदर्श मराठी शाळा खरसई येथे शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष तथा व शेकाप युवक अध्यक्ष निलेश मांदाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना  जोशी, ग्राम पंचायत सदस्य जगदीश खोत ग्राम प्रवर्तक अमोल पाटील,सायली बिर्जे,  अनिल गाडेकर,अशोक सानप,पाटील मॅडम यांच्यासह शिक्षक,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थ्यानी स्वच्छतेची शपथ घेऊन गावात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला 


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा