श्रीवर्धन तालुक्यात रानडुकरांची संख्या वाढली : शेतकऱ्यांच्या त्रासात भर


श्रीवर्धन : प्रतिनिधी
तालुक्यात वनसंपदा मोठी आहे लागूनच म्हसळा तालुक्यातील काही भाग घनदाट जंगलांचा आहे त्यामुळे रानडुक्करांनी खाद्याच्या शोधात आपला मोर्चा ग्रामीण भागाकडील शेतीकडे वळविला आहे . त्यामुळे शेतीची नासधूस झाल्याने शेतकर्यांच्या त्रासात भर पडली आहे तालुक्यातील म्हाबदे धनगरमलई सर्वे , गाणी , कोंढे , कारीवणे व कोलमांडले परिसरात घनदाट जंगले आहेत . तालुक्यातील सर्वे गावाच्या हद्दीत काही स्थानिक नागरिकांनी रानडुकर पकडण्यासाठी मोटारसायकलच्या एक्सलेटर केबलचा फास लावला होता . त्यानंतर या फासामध्ये रानडुक्कराऐवजी बिबट्या अडकुन मृत झाला होता . त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती . त्या प्रकरणात दोन आदिवासी आरोपींना अटक झाली होती . यानंतर वनविभागामार्फत या रानडुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत . त्याचा त्रास शेतकरी बांधवांना होत आहे . रात्रीच्या वेळी रानडुकरे लोंबी फुटलेल्या भातशेतीत घसुन शेतातील चिखलात लोळून तयार होत आलेले पिक झोपवून टाकत आहेत . एकावेळी एक दोन नाही तर १० ते १५ डुक्करांचा कळप भातशेतीत घुसल्यावर पूर्ण शेती झोपवून टाकत आहेत . तरी वनविभागाने डुक्करांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा