आंबेत ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीला हद्दपार करण्यात युवासेनेचा मोठा वाटा ; संदीप डोंगरे


म्हसळा (बाबू शिर्के)
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत म्हसळा तालुक्यातील सर्वात जास्त महसूल देणारी तसेच माजी मुख्यमंत्री दिवंगत स्व. बॅरिस्टर ए आर अंतुले यांची जन्मभूमी असणारी आंबेत ग्रामपंचायत मध्ये शिवसेना काँग्रेसने युती करून राष्ट्रवादीला हद्दपार केले आहे. या ग्रामपंचायतमध्ये शिवसेना काँग्रेस युतीने सरपंच सहित आठ जागा जिंकून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.सरपंच पदाच्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेस च्या अफ्रोजा नाझीम डावरे या बहुमताने विजयी झाल्या.आंबेत मधील सर्वसामान्य जनता हि राष्ट्रवादीच्या कारभाराला त्रासली होती तसेच या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या विजयात घेतलेल्या मेहनतीत आणी राष्ट्रवादीला हद्दपार करण्यात काँग्रस आणी शिवसेनेच्या नेत्यांसोबत युवासेनेचा सुद्धा मोठा वाटा आहे  हि ग्रामपंचायत जिंकून स्व.बॅरिस्टर ए आर अंतुलेना युवासेनेतर्फे श्रद्धांजली वाहिली असे मत युवासेना संपर्क प्रमुख संदीप डोंगरे यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा