संजय खांबेटे: म्हसळा प्रतिनिधी
वारळ येथील अनंत रामचंद्र चाळके यांचे घर अज्ञात चोरट्यानी गुरुवार दि. २७ रोजी सकाळी ९ ते दु.३ चे दरम्यान फोडून रु २ लक्ष रोख व सुमारे १ लक्ष २९ हजाराचे दांगीने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने म्हसळा पोलीसानी गु.र.नं.३२/२०१८ भा.द.वी.४५४ ,३८० प्रमाणे नोंद केली. सदर गुन्ह्यातील रोख ख्कम व दागीने आमच्या मुंबईच्या घरात आसल्याचे फिर्यादीने म्हसळा पोलीसाना सांगितले.
या घटनेत क्रमवारीने तपास करताना पोलीसांची पावले( तपास) घराबाहेर जात नसल्याने तपासी अधिकारी पोसई दिपक ढुस यानी फियादी चाळके याना आपण मुंबईतून आणलेले रोख रक्कम व दागीने या बाबत घटनाक्रमा नुसार स्मरण करा ,घटनेत गुन्हा करताना चोरटयानी घरफोडी करून घरात प्रवेश केलेला दिसत नाही. चोरटा तुमच्या संबधीत माहीती पैकी असावा असा तर्क काढला होता . अखेर तोच खरा ठरला. फिर्यादी अनंत रामचंद्र चाळके यानी डब्यात असलेली रक्कम व दागीने मुंबईतील घरीच काढून ठेऊन रिकामा डबा बॅगेत भरला व गावाकडे आल्यावर डब्यात रक्कम व दागीने नसल्याने भांभाऊन चोरीची तक्रार नजर चुकीने दाखल करण्यात आल्याचे चाळके यानी सांगितले.

Post a Comment