संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील रा.जी.प शाळा ताम्हने करंबे येथील शिक्षकाने शाळेत नोंद घेण्यासाठी आलेल्या प्रा.आ. केंद्र खामगांव येथील आरोग्य सेविकेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवार दि ६ सप्टेंबर रोजी घडली . मंगळवार दि. ११ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे घटनेबाबत रीतसर लेखी तक्रार करुन २० दिवस उलटल्या नंतर कोणतीही कारवाई न केल्याने पीडीत महीलेने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान पंचायत समीती म्हसळा यानी महीला सदस्यांची चौकशी समिती नेमली व त्यांच्या अहवाला नुसार मुं.का.अ. जिल्हा परीषद अलिबाग यानी गुरवार दिं .४ ऑक्टो. पासून
ताम्हने करंबे येथील शिक्षक कमलाकर धुळगुंडे याला निलंबन केले आसल्याची माहीती ग.वि.अ. वाय.एन. प्रभे यानी दिली.
संबंधीत घटनाक्रम पहाता घटना घडली ६ संप्टेबरला, B.D. O. कडे तक्रार ११ संप्टेबरलला, पोलीसांकडे तक्रार ३० संप्टेबरला दाखल केली. सर्व घटनाक्रम पहाता पिडीत कुटुंबाची गटविकास अधिकाऱ्यानी तात्काळ दखल घेणे आवश्यक होते दोनही कर्मचारी जि.प. आरोग्य व शिक्षण विभागाचे होते. चौकशी व निलंबन यासाठी उशीर केल्याने पिडीत कुटुंबाला मानसीक जखमा झाल्या. पोलीसांत दिलेल्या तक्रारीत सह आरोपी म्हणून असलेल्या पत्नी शिक्षीकेवर कोणतीच कारवाई का नाही?
महादेव पाटील , माजी सभापती, पं.स. म्हसळा

Post a Comment