श्रीवर्धनमधील लेटलतीफ शिक्षकांवर कुणाचे लक्ष ?


दांडगुरी : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेत सभापती व पालकांनी भेटी दिल्या असता शिक्षक वेळेत हजर नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे अशा लेटलतीफ शिक्षकांवर कुणाचे लक्ष ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे . दिघी केंद्रातील मणेरी - नानवेळी येथील मराठी शाळा , सर्वे गावातील मराठी व उर्दू , दिघी येथील उर्दू शाळा , हरवीत गावातील उर्दू , तसेच कुडगाव आणि दिघी शाळेवर सकाळी अचानक भेटी दिल्या असता हा प्रकार समोर आला . श्रीवर्धन पंचायत समिती सभापती मीना कुमार गाणेकर , मणेरी व मानवेल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुमती शिवणे , प्रमोद गोरीवले , एजाज हवालदार तसेच पालक यांनी संयुक्तिक भेटी दिल्या . प्रत्येक विद्यार्थ्यांने शाळेत जावे , कोणीही शिक्षणापासुन वंचित राहू नये . यासाठी शासन नेहमीच कोणते न कोणते उपक्रम राबवित असते व विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देखील पुरविल्या जातात त्याबरोबरच विद्यायचे शालेय नुकसान होऊ नये याकडे सुद्धा लक्ष ठेवले जाते . मात्र , स्थानिक मराठी व उर्दू शाळेत शाळेत काही वेगळच दृश्य बघायला मिळत आहे या शाळेतील विद्यार्थी तर वेळेवरच शाळेत येतात . परंतु या शाळेतील मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांच्या लेटलतीफपणामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत असल्याची बाब पुढे आली आहे . त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करा अशा मागणीचे निवेदन पालकांनी गटशिक्षणाधिका-यांना दिली आहे दिघी केंद्रांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या ९ शाळा असुन येथे चौथी व सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते . श्रीवर्धन तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक दररोज बाहेरगावावरून ये - जा करत असल्यामुळे शाळेत वेळेवर हजर राहत नाही . या शाळेतील मुख्याध्यापक देखील बाहेरगावावरून ये जा करतात व उशिरा शाळेत पोहोचतात तर शिक्षकच कसे वेळेवर येणार ? असा प्रश्न पालकांनी उठवला साडे सातची शाळेची वेळ असताना , आठ ते नऊ वाजले तरी शाळेत शिक्षक पोचत नाही . विद्यार्थीच वर्ग खोल्या उघडतात . त्यामुळे दोषी शिक्षकांवर तात्काळ योग्य ती कारवाई करून त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी , जेणे करून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार नाही . अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा एजाज हवालदार यांनी दिला आहे . 

विद्यार्थी वेळेत हजार होत असताना शिक्षक शाळेत वेळेवर न येणे चुकीचे असून याबाबत गटशिक्षणाधिकायांना सांगण्यात येईल .
- मीना गाणेकर , सभापती , श्रीवर्धन पं . स 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा