म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला सतावणारा देहन - पांगळोली रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा उपाध्यक्ष तथा विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते २० ऑक्टोबर रोजी देहेन फाटा येथे भुमिपूजन करण्यात आले यावेळी सरोज म्हशीलकर , मंगेश म्हशीलकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य , शैलेश पटेल तालुकाध्यक्ष , प्रकाश रायकर तालुका सरचिटणीस , तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस , मंगेश मुंडे , मिना टिंगरे तालुकाध्यक्ष महिला मोर्चा , आनंदकुमार सावंत जिल्हा चिटणीस कामगार आघाडी , शरद चव्हाण अध्यक्ष युवा मोच , समीर धनसे अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा , लह तुरे तालुका उपाध्यक्ष , यशवंत म्हात्रे तालुका उपाध्यक्ष अनिल टिंगरे तालुका चिटणीस , सुनील शिंदे अध्यक्ष किसान मोर्चा , संतोष सावंत तालुका चिटणीस दिनेश बामने अध्यक्ष वाहतूक सेल , प्रियंका शिंदे सरचिटणीस महिला मोर्चा , अविनाश मुंडे तालुका चिटणीस युवा मोर्चा , परवेज चिलवान तालुका उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा , रमेश पोटले , मनोहर जाधव अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा , घनश्याम जाधव , विश्वनाथ कदम , रावजी घाणेकर व ग्रामस्थ उपस्थित होते . भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी , सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून देहेन - पाटी - पांगळोली रस्ता इजिमा यांचे रूपांतर प्रजिमा करण्यासाठी भाजप कार्यकत्यांना सोबत घेऊन पाठपुरावा केला आहे आणि त्याला यश आले असून या रस्त्याला प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण १ कोटी ६६ लाख ७१ हजार रुपये एवढा निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी पाटी येथे बस थांबा बांधणे व शाखा फलकाचे भूमिपूज, लाभार्थ्यांना गॅस वाटप कुडगांव येथे अंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ पांगळोली व कुडगाव येथे भाजपा शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले . संदेरी येथे साकव बांधणे अंदाजीत रक्कम ५ लक्ष कामाचे भूमिपूजन व भारतीय जनता पार्टी शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले आंबेत येथे शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले खामगांव येथे बाल स्मशानभूमिकडे जाणार रस्ता बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले

Post a Comment