गणेश प्रशाळे : दिघी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे शिवशक्ती नवरात्रोत्सव मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते . सांस्कृतिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असलेल्या बोर्लीपंचतन येथे सोमवारी ठाणा बैंड प्रस्तुत आगरी कोळी रिमिक्स हिंदी , मराठी गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम सुपरस्टार जगदीश पाटील यांचा ऑकेस्ट्राने दिमाखात साजरा करण्यात आला . शिवशक्तीनगर येथील नवरात्रोत्सवात बोर्लीपंचतन परिसरातील रसिकांनी एक धमाल कार्यक्रमांचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नारायण पाके यांच्या हस्ते करण्यात आले . प्रसंगी सभापती मीना गाणेकर , माजी सभापती सुकुमार तोंडलेकर , लीलाधर खोत , चंद्रकांत तोडणकर , उत्तम दिवेकर , सुधीर दिवेकर , निवास गाणेकर , शंकर गाणेकर , रत्नाकर पाटील , दीपक दौंडकर , संतोष गायकर , ज्योति परकर , भारती घनावडे , सुषमा दिवेकर , सायली गाणेकर अदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली . दीपप्रज्वलन माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामकांत भोकरे शिवप्रतीमेस पुष्पहार सरपंच गणेश पाटील यांनी अर्पण केले . मंडळाकडून वेळो वेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक समाजसेवकांचे सत्कार करण्याचा उपक्रम राबविला जातो . या बद्दल सरपंच गणेश पाटील यांनी मंडळाचे कौतुक केले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच मंदार तोडणकर हे होते . मंडळाच्यावतीने दरवर्षी सामाजिक , सांकृतिक व शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात यातून समाज एकत्रित केला जातो . या प्रेरणेला प्रोत्साहन मिळण्यासाठी स्थानिक सर्वपक्षीय सहकार्य मिळणे गरजेचे आहे नवरात्रोत्सवानंतर पुढे निवडणूक उत्सवात सुरुवात होत आहे .
यासाठी सर्व पक्ष एकत्र येत बोर्लीपंचतन शहर विकासाच्या दृष्टीकोनातून वातावरण बदलावं असे आवाहन मंदार तोडणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले . शेवटी मनोरंजनासाठी रसिक प्रेक्षकांच्या आवडीप्रमाणे ऑकेस्ट्राचे आयोजन मंडळाच्यावतीने करण्यात आले होते . यावेळी आयोजित करण्यात आलेला जगदीश पाटील ऑक्रेस्ट्रा या उत्सवाचे खास आकर्षण ठरले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटकर व भायदे यांनी केले . शिवशक्ती मंडळाकडून दरवर्षी नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . यावेळी मागील बऱ्याच कालावधीपासून आशा कार्यक्रमाची बोर्लीकरांना उत्सुकता असल्याने या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व बोर्लीपंचतन परिसरातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यामुळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

Post a Comment