राष्ट्रवादी काँग्रेसने केला संजय राऊतांचा निषेध तर शिवसेनेने केला राष्ट्रवादीचा निषेध ; शिवसैनीक मोठया ताकदीने उतरले रस्त्यावर.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळ्यात आज दैनीक सामना व संपादक संजय राऊत यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन व सामना वृत्त पत्राची होळी करणार असा बोल- बाला झाल्याने शहराचे सकाळ पासून वातावरण तापले होते पोलीस बंदोबस्त चोख होता. शहरात मोठ्या प्रमाणात शिवसैनीक जमत होते व पोलीस प्रशासनाने दखल घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अली कौचाली यांचे नेतृत्वाखाली शाहीद उकये, संजय कर्णिक, समीर काळेखे , फहद मुंगये, अब्दुल घनसार, अकलाख कादरी, इकबाल घरटकर, महमद सलीम हळदे, नवाज दिसवाक या कार्यकर्त्यनी आंदोलनाचा कोणताही भाग न करता तहसीलदार म्हसळा याना संजय राऊत यांचे निषेधाचे निवेदन देऊन वेळ मारून नेली.
शिवसेना ठरली अकमक व वरचढ...
राष्ट्रवादी काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनाला तेवढयाच ताकदीने उत्तर देण्यासाठी तालुका प्रमुख प्रमुख नंदू शिर्के यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या संखेने शिवसैनीकांची तालुका कार्यालयात जमवा जमव झाली होती त्यानीही दिघी नाका ते तहसील कार्यालय मोर्चा नेऊन अजीत पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध करुन तहसीलदार याना निवेदन दिले यावेळी
अनंत कांबळे - उप तालुका प्रमुख महादेव पाटील - माजी सभापती पांडुरंग बने - जेष्ठ शिवसैनिक अमित महामुनकर युवासेना तालुका अधिकारी अनिकेत पानसरे - शहर प्रमुख अक्रम साने - उप शहर प्रमुख निशाताई पाटील - उप तालुका महिला आघाडी गणू बारे - पाभरे विभाग प्रमुख तुकाराम चालके - मेंदडी विभाग प्रमुख अमोल पेंढारी - वरवटणे विभाग प्रमुख हे उपस्थित होते. शिवसेना व मुखपृष्ठ सामना या बाबत आमच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य शिवसैनिक सहन करणार नाहीत आम्ही जशास तसे ठणकाऊन उत्तर देऊ असे ता.प्र. नंदू शिर्के यानी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची परस्पर विरोधी आंदोलनात नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कौचाली यांचे निवेदन उभे राहून घेतले, या उलट शिवसेनेचे निवेदन खुर्चीत बसून घेतले या परस्पर विरोधी महसुली धोरणा बाबत नाराजी व्यक्त केली याबाबत तक्रार करणार असल्याचे शिर्के यानी सांगितले.


Post a Comment