फोटो संग्रहित : प्लॅस्टीक बाबत कारवाई व अंदोलन
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शांतीधाम ( स्मशान भूमी )भूमिपूजन सभेमध्ये अली कौचाली याना व्यासपीठ मिळाल्यावर त्यानी म्हसळा नगरपंचायतीने प्लॅस्टीक बंदी विषयी केलेल्या कारवाईच्या संदर्भात नगरपंचायतीचे C.E.O. विश्वास गारवे यांनी केलेल्या कायदेशीर कारवाईला आव्हान करत गारवे नी म्हसळ्यातील माझ्या गरीब व्यापाऱ्यांवर बाहेरून आधिकारी आणत कारवाई करण्यापेक्षा पिशव्या ज्या गुजरात मध्ये तयार होतात त्या कारखान्यांवर कारवाई कराचे धाडस करावे असे आव्हान देत कायद्याचे विरुद्ध बंड करून शायनींग केले या कौचाली यांच्या मुद्दाला माजी आमदार तटकरे यानी चपराक देत अलीशेठ ," कायद्याला आव्हान करू नका या भाषेत कौचाली यांची कान उघाडणी केली, या बाबत म्हसळ्यातील या निर्णयामागे कोण आहे, त्या मुख्य सूत्रधाराला लक्ष करावे अशी समज दिली. माजी आमदार तटकरे यानी नगरपंचायतीच्या कार्यक्रमात कायद्याने कारवाई बाबत संकेत दिल्याने प्लॅस्टीकचा वापर व विक्री करणाऱ्याना एन सणा सुदीत धडकी भरली आसल्याची चर्चा आहे.

Post a Comment