
टेक प्रतिनिधी
भारतीय बाजारपेठेसह जगभरात एकेकाळी राज्य केलेल्या नोकिया या ब्रँडने पुन्हा नव्या दमाने बाजारपेठेत शिरकाव केला आहे. एचएमडी ग्लोबलने आज भारतीय बाजारात नोकियाचे 6.1 प्लस आणि 5.1 प्लस हे दोन फोन लाँच केले.
नोकियाने चीनमध्ये एक्स 6 हा फोन लाँच केला होता. Nokia 6.1 Plus हे त्याचेच जागतिक व्हर्जन आहे. या दोन्ही फोन्सना आयफोन X सारखा नॉच डिस्प्ले आहे. तसेच कंपनीने दोन्ही फोनमध्ये नॅनो पेंटींग टेक्नॉलॉजी आणि रिअर ग्लास फिनिश सारखे नवी वैशिष्टे दिली.
हे दोन्ही स्मार्टफोन नोकियाच्या संकेतस्थळावर आणि ई-कॉमर्ससाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नोकिया ६.१ प्लसची किंमत १५ हजार ९९९ आहे. तर, नोकिया ५.१ प्लस मोबाइलची किंमत १० हजार ९९९ आहे
काय आहेत वैशिष्ट्ये?
नोकिया ६.१ प्लसमध्ये ५.८ इंचाचा एचडी (१०८० X २२८० पिक्सल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टो-कोर स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम आहे. तर, ६४ जीबी इनबिल्ट मेमरी असून मेमरीकार्डने ४०० जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. अॅण्ड्रॉइड ८.१ ओरिओ ऑपरेटिंग सिस्टम असून हा ड्यूल सीम मोबाइल आहे. तर, ३०६० एमएएच बॅटरी असणार आहे. मोबाइलमध्ये ड्यूल रिअर कॅमेरा असून १६ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर कॅमेरा आहे. त्याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सल कॅमेरा आहे.
नोकिया ५.१ प्लसमध्ये ५.८ इंचाचा एचडी (१०८० X २२८० पिक्सल) डिस्प्ले आहे. १३ मेगापिक्सल प्रायमरी आणि ५ मेगापिक्सल सेकंडरी सेंसरसह ड्यूअल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. नोकिया ५.१ प्लसमध्ये अॅण्ड्रॉइड ८.१.० ओरिओ ऑपरेटिंग सिस्टम आहे.
Post a Comment