संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
मा.जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या आदेशानुसार व प्रदेशाने दिलेल्या कार्यक्रमानुसार मा.श्री.कृष्णा कोबनाक उपाध्यक्ष रायगड जिल्हा तथा अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती निमित्त मंगळवार दि 02 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत म्हसळा शहर ते पाभरे शिवाजीनगर पर्यंत पदयात्रा (10.00 कि. मी) काढण्यात आली. यावेळी म्हसळा शहरातुन भाजपा जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात करून नंतर बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय शहरातील रस्ते तसेच मौजे सुरई, खारगांव बु ग्रामपंचायत कार्यालय व परिसर, पाभरे ग्रामपंचायत कार्यालय व परिसर, शिवाजीनगर येथे स्वच्छता अभियान व स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आले. यावेळी कृष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा तथा उपाध्यक्ष रायगड जिल्हा, प्रशांत
शिंदे जिल्हा उपाध्यक्ष, सौ.सरोज म्हशीलकर जिल्हा चिटणीस, शैलेश पटेल तालुका अध्यक्ष, प्रकाश
रायकर तालुका सरचिटणीस, तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस, मंगेश म्हशीलकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य, महेश पाटील जिल्हा चिटणीस युवा मोर्चा सौ.मीना टिंगरे तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, शैलेश खापणकर शहर अध्यक्ष श्रीवर्धन, शरद चव्हाण तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, मंगेश मुंडे शहर अध्यक्ष म्हसळा, समीर धनसे अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा, भालचंद्र करडे तालुका उपाध्यक्ष, मनोहर जाधव अनुसूचित जमाती मोर्चा, सौ.प्रियांका शिंदे तालुका सरचिटणीस महिला मोर्चा, सुनील शिंदे अध्यक्ष किसान मोर्चा, अनिल टिंगरे तालुका चिटणीस गजानन
निंबरे अध्यक्ष सोशल मीडिया, दिनेश बामणे अध्यक्ष वाहतूक सेल, दुर्जनसिंग राजपूत उपाध्यक्ष शहर,
अनंत पाटील बूथ अध्यक्ष काळसुरी, प्रशांत महाडिक गण अध्यक्ष,अविनाश मुंडे तालुका चिटनीस युवा
शरद कांबळे तालुका चिटणीस युवा, दिलीप कोबनाक, संदीप कोबनाक, धर्मा पाटील बूथ अध्यक्ष खरसई सुनील भोजने गांव अध्यक्ष,
.प्रदिप मुंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment