विकास माझी जात : माणुसकी माझा धर्म : सुनील तटकरे



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील शांतीधाम ( हिंदू  स्मशान भूमी ) योजनेच्या  भूमीपूजन कार्यक्रम आज माजी आमदार सुनील तटकरे यांच्याहस्ते संपन्न झाला त्यावेळी तटकरे यानी विकास हाच मुद्दा पकडत विकास माझी जात माणुसकी माझा धर्म आसल्यामुळे सर्व जाती धर्मातील लोक माझा आदर व सन्मान करतात असे सांगितले. म्हसळा नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेतून म्हसळा शहरातील हिंदू स्मशान भूमीला रु २५ लक्ष निधी राज्य शासनाकडून मिळाला त्याचा भूमीपूजन समारंभ तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा श्रीमती हुजुर्क, आमदार अनिकेत तटकरे, तालुका व शहर हिंदू समाज अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेठ करडे, समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, जि.प. सदस्य बबन मनवे, कु. धनश्री पाटील , नाजीम हसवारे, संजय कर्णिक, दिलीप कांबळे , आली कौचाली,रियाज घराडे, माजी जि. प . सदस्या  वैशाली सावंत, अशोक काते व हिंदू ग्रामस्थ पदाधिकारी बहुसंखेने हजर होते. तटकरे यानी म्हसळा, आंबेत व पाभरे न.पा. पु. योजना प्रशासनाने नामंजूर करूनही मी धरलेल्या हट्टामुळे अजीतदादानी नकारात्मक नास्तीला  सकारात्मक केले असे सांगत रखडलेली म्हसळा न.पा. योजना लौकरच सुरु होईल असे सांगितले. रायगडचे खासदार व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्यावर थेट हल्ला करत केंद्र सरकारवर अविश्वास ठराव दाखल असताना ते सदनात हजर  नव्हते असा स्फोट केला , मंत्री असलेल्या गीतेंच्या ताब्यांत असलेल्या पोलादपूर व तळा या दोन नगरपंचायती मध्ये झालेला विकास आणि एकटया म्हसळा नगरपंचायती चा विकास असा आभ्यास केला तर म्हसळ्यात मी जास्त निधी दिला आहे हे अभिमानाने सांगतो हिम्मत असेल तर गीते ना  ऐका व्यासपीठावर येण्याचे माझे आव्हान आहे. यावेळी तटकरे यानी पंतप्रधान मोदींचे अच्छे दिन , गरीबांच्या खात्यात रु १५ लक्ष जमा करण्याबाबत टीका केली, म्हसळा नगरपंचायतीला जि.प. शाळेबाबत लौकरच ना हरकत देण्यात येणार आहे व म्हसळा नगरपंचायतीची इमारत ही राज्यातील नव्याने नगरपंचायत झालेल्या १५० ग्रामपंचायतीतील पहीली ग्रामपंचायत असेल असे सांगितले. यावेळी समीर बनकर , बाळशेट करडे यानी आपल्या भाषणात शिवसेना व गीतेंवर जोरदार टीका केली.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा