प्रतिनिधी : म्हसळा
२०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळेच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. प्रत्येक मतदार संघात भेटी गाठी सुरू झाल्या आहेत, तसेच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ही राजकीय पक्षांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्रीवर्धन मतदार संघातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर वासीय शिवसैनिकांचा निर्धार मेळावा दादर (मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे.
मिशन २०१९ अंतर्गत रायगड लोकसभा व श्रीवर्धन विधानसभेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यासाठी रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता दादर (मुंबई) येथे निर्धार मेळाव्या आयोजन करण्यात आल्याचे म्हसळा तालुका सहसंपर्क प्रमुख अनिल काप यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. या निर्धार मेळाव्यासाठी शिवसेना नेते, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा. श्री. अनंतजी गीते उपस्थितीत राहणार आहेत. तसेच मा. श्री. सदानंद थरवळ - दक्षिण रायगड संपर्क प्रमुख, मा. सौ. सुवर्णा ताई करंजे - दक्षिण रायगड म. संपर्क संघटिका, मा. श्री. भरतशेठ गोगावले- आमदार- महाड- पोलादपूर- माणगाव विधानसभा, मा.श्री. तुकारामजी काते - आमदार- अणुशक्तीनगर विधानसभा, रवीभाऊ मुंढे - दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख, मा. श्री. तुकारामजी सुर्वे, माजी आमदार -श्रीवर्धन विधानसभा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीवर्धन मतदार संघातील सल्लागार, उपजिल्हा प्रमुख,संपर्क प्रमुख, क्षेत्र संघटक, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, , उप शहर प्रमुख, नगराध्यक्ष,विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, गट प्रमुख नगरसेवक, महिला तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, महिला शहर प्रमुख, युवा सेना पदाधिकारी, तालुका अधिकारी, उप तालुका अधिकारी ,शहर अधिकारी,उप शहर अधिकारी, ग्राहक संरक्षण कक्ष ,शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकारी व शिवसेना संलग्न सर्व संघटनेचे आजी माजी पदाधिकारी,मतदार संघातील प्रत्येक गाव मुंबई मंडळ अध्यक्ष, शिवसैनिक, युवासैनिक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.
- श्री.अनिल नारायण काप, म्हसळा तालुका सहसंपर्क प्रमुख


Post a Comment