म्हसळ्याला पावसाने झोडपले : विजेच्या कडकडाटा सह चार -५ तास पाऊस बरसला


संजय खांबेटे :  म्हसळा प्रतिनिधी 
आज सायंकाळी ६ च्या दरम्यान जोरदार मेघगर्जनेसह म्हसळ्याला पावसाने झोडपले. शेतकऱ्यानी मोठया प्रमाणात कापणी केलेले भात, नाचणीची पिके घरात आणली नसल्याने आजच्या पावसाने फार नुकसान झाले. यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली त्यामुळे भात पीक  फारसे वजनदार झाले नसतानाच या आस्मानी संकटाने तालुक्यातील शेतकरी संकटात आला आहे. सातत्याने हवामानातील बदल व अवकाळी पावसाने तालुक्यातील खरीप पिकाखालील क्षेत्र दिवसें दिवस कमी होत असतानाच अशा पद्धतीच्या संकटाने बळीराजा नाराज झाला आहे. तालुक्यातील ३० % क्षेत्रातील पिक कापून उडव्या रचल्या आहेत , ३० % क्षेत्रातील पिक कापून शेतात आसल्याचा शेतकऱ्यानी आंदाज वर्तविला आहे उर्वरीत शेती  कापण्याच्या स्थितीत आसल्याचा अंदाज आहे.

म्हसळा तालुक्यात ५/६ वर्षापूर्वी ३१०० हेक्टर मध्ये भातपिक घेतले जायचे, आज केवळ २३०० हेक्टर मध्ये पिक घेतले जात आहे .आजच्या पावसाने शेतकऱ्यांचे फार अर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पाहाणी करुन शेतकऱ्याना नुकसान भरपाई द्यावी.
महादेव पाटील, माजी सभापती , पं.स. म्हसळा


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा