म्हसळा शहरात सार्वजनिक वाचनालय तसेच रा.जी.प. शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा,
म्हसळा : सुशील यादव
“प्रत्येकाला वाचनातून बोध व आनंद घेता आला पाहिजे” असे प्रतिपादन म्हसळा येथील प्रसिद्ध कवी विलास यादव यांनी रा.जी.प. शाळा म्हसळा नं १ येथील वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. वाचनामध्ये संस्कारक्षम पुसत्कांचा समावेश असायलाच हवा असेही ते म्हणाले. मी आज जो लेखन व कविता करतो ते केवळ वाचनामुळेच. असे सांगून यादव यांनी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना वाचनाप्रति प्रेरित केले. भारत रत्न, मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त१५ ऑक्टोबर. २०१८ हा दिवस सार्वजनिक वाचनालय म्हसळा व रा.जी.प. शाळा म्हसळा नं १ येथे वाचन प्रेरणा दिवस म्हणून मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेच्या म्हसळा शाळा नं. १ मध्ये यानिमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून कवी विलास यादव यांचा शालेय व्यवस्थापन चे उपाध्यक्ष सुनील आंजर्लेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिनाचे औचित्याने भेट देऊन विविध विषयांची पुस्तक वाचून मनोसोक्त आनंद घेतला आणि वाचनाचे महत्त्व मनोगत व्यक्त करून सांगितले. रा.जी.प. शाळेतील कार्यक्रमात प्रास्ताविकामध्ये राजेंद्र मालुसरे सरांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी सखोल माहिती विद्यार्थी व उपस्थिताना दिली.शालेय व्यवस्थापन सदस्य प्रवीण करडे यांनी वाचनाचे महत्त्व, अग्निपंख याविषयी छान माहिती दिली. सा.वा.चे सचिव अशोक काते, रा .जी.प. शाळा म्हसळे नं १चे माजी अध्यक्ष सुशिल यादव, उपाध्यक्ष सुनिल आंजर्लेकर,शिक्षिका कल्पना पाटील, खामगावकर मॅडम , मेथा मॅडम , खोत मॅडम ,पालक सदस्य प्रशांत करडे,सदस्य सुधीर मोहिते,ग्रंथपाल उदय करडे,लिपीक धनश्री नाक्ती,मदतनीस सायली चोगले आणि विध्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.आयोजित दोनही कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थी वर्गाला वाचनाचे महत्त्व आणि डॉ. ए.पी.जे.अब्दुल यांचे देश हिताचे कार्य विषद करण्यात आले.सार्वजनिक वाचनालय 'वाचन ध्यास',वाचन संस्कृती जोपासना आणि वाचनाची आवड सर्वांनाच व्हावी या उद्देशाने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयात नेहमी सामाजिक चळवळ व जागृती करीत विविध उपक्रम राबविले जातात.

Post a Comment