श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
श्रीवर्धन च्या पायाभूत विकासात आय काँग्रेस चे महत्वाचे योगदान आहे .बॅरिस्टर अंतुले साहेब यांनी कोकणातील सर्वसामान्य व्यक्तीच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केले आहे .आज पुन्हा एकदा कोकणच्या विकासासाठी सर्वसामान्य जनता इंदिरा काँग्रेस पक्षास बळकटी प्राप्त करून देत आहे. रायगड जिल्ह्यातील इंदिरा काँग्रेस सशक्त बनवण्याचा निर्धार नाविद अंतुले यांनी श्रीवर्धन कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात केला .
काँग्रेस पक्षाने जनताभिमुख कार्य केले आहे .देशातील सर्व घटकांना समान संधी काँग्रेस पक्ष च देऊ शकतो. सकारात्मक विचार देशाच्या दृष्टीने हिताचा आहे .असे अंतुले यांनी म्हंटले .श्रीवर्धन तालुक्यात काँग्रेस ला पूर्वीचे दिवस प्राप्त होतील .श्रीवर्धन आपला जुना मतदार संघ आहे .जुन्या व नवीन सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू असे आव्हान म्हसळा तालुका आय काँग्रेस अध्यक्ष मुईज शेख यांनी केली .कार्यकर्ता - पक्ष संवाद कार्यक्रमात
योगेश गंद्रे ,नगरसेविका शाबीस्ता अन्सारी व इतर पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment