पुनीर गावाची ग्रामदेवता - पुनाई देवी जीर्णोद्धार व विकासाच्या प्रतीक्षेत ; पाच पिढ्यांच्या परंपरेचा इतिहास

 

श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते

ऐतिहासिक दृष्ट्या श्रीवर्धन तालुका महत्वाचा आहे .आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट यांची जन्मभूमी व मुरुड जंजिरा स्थित हबशी पोर्तुगीज लोकांचे साम्राज्याचा गतकालीन इतिहास श्रीवर्धन तालुक्यास आहे .पुनीर गावचे  पेशवे काळा पासून ग्रामदैवत असलेली पुनाई देवी मंदिर परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे .पुनीर गावची ग्रामदेवता असलेली पुनाई देवी च्या जीर्णोद्धाराची नितांत आवश्यकता आहे.
     श्रीवर्धन शहरा पासून अवघ्या 05 किमी अंतरावर पुनीर गाव वसलेले आहे. पुनीर गावची लोकसंख्या 180 च्या आसपास आहे . पुनाई देवी मंदिर हे पेशवे कालीन आहे .श्रीवर्धन व म्हसळा या दोन तालुक्यावर जंजिरा स्थित सिद्दी चे वर्चस्व होते .प्राप्त माहिती नुसार प्लेग ची साथ आल्या नंतर 1800 शतकात  मुळ गाव स्थलांतरित झाले आहे. आजमितीस ग्रामदेवता पुनाई देवी च्या मुळ मूर्तीस व्रज लेपन करण्यात आले आहे. मुर्ती अतिशय सुबक व आकर्षक आहे .परंतु मंदिर परिसराच्या सभोवताली सर्वत्र गवत वाढलेले निदर्शनांस येत आहे. श्रीवर्धन दिघी मार्गावरील मुख्य रस्त्यापासून पुनीर गावा पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.मंदिराच्या आवारात स्वच्छता , पाणी व इतर पर्यटन पूरक बाबींचा अभाव आहे. मंदिराच्या प्राचीन ते विषयी माहिती अतिशय कमी लोकांना ज्ञात आहे .पेशवे काळात सदर मंदिर अतिशय साध्या पद्धतीने स्थापन करण्यात आले होते .त्या काळी लाकूड फाटा व कुडाचा वापर करून मंदिर बांधण्यात आल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले .

2001 मध्ये मंदिराच्या भिंती व छत याची डागडुजी करण्यात आली. आजमितीस मंदिराच्या प्रांगणात व सभोवताली अनावश्यक घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्या मध्ये लाकूड फाटा ,तुटलेली छताची तुकडे ,व वाळलेल्या गवताचा समावेश आहे. या भग्नावशेषा मुळे मंदिराला एक प्रकारे  अवकळा प्राप्त झाली आहे. मंदिराचा  28 गुंठ्याचा परिसर आहे .त्यामुळे सदर मंदिराचा जीर्णोद्धार केल्यास भविष्यात पर्यटनास चालना मिळू शकते .पुनीर गावाच्या हद्दीत करोडो रुपये खर्च करून पुनीर सिटी ची निर्मिती केली जात आहे. श्रीवर्धन तालुक्यात पाच वर्षांपासून पर्यटन व्यवसायास चालना मिळाली आहे. मात्र पुनीर गाव आज ही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे .मंदिर जीर्णोद्धार झाल्यास स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमांतून रोजगार उपलब्ध होऊ शकतो.


नवरात्र उत्सव विशेष

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा