संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील रा.जी.प शाळा ताम्हने करंबे येथील शिक्षकाने शाळेत नोंद घेण्यासाठी आलेल्या प्रा.आ. केंद्र खामगांव येथील आरोग्य सेविकेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवार दि ६ सप्टेंबर रोजी घडली . या प्रकरणी पिडीत आरोग्य सेविकेने मंगळवार दि. ११ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे घटनेबाबत रीतसर लेखी तक्रार करुन २० दिवस उलटल्या नंतर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत तीने गुन्हा दाखल केला .
सविस्तर वृत्त असे की, खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका गोवर व रुबेला लसीकरण व अन्य आरोग्य विषयक योजना राबविण्यासाठी तालुक्यातील रा.जी.प. शाळा ताम्हाने करंबे येथे शाळाचा पट व अन्य माहीती घेण्यासाठी दुपारी २च्या सुमारास गेली असता तेथील शिक्षक कमळाकर धुळगुंडे याने त्या आरोग्य सेविकेचा हात खेचून तिझ्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले.आरोग्य सेविकेने या कृत्याचा विरोध करुन तेथून पळ काढण्याचे धाडस केले असता संबंधीत शिक्षकाने तीचा पाठलाग केला, गाडी ओव्हरटेक मारून घडलेला प्रकार कोणाला सांगितलास तर तुला बघुन घेईन अशी धमकी दिल्याची तक्रार म्हसळा पोलीसांत दिली आहे. संबधीत शिक्षक व त्याची पत्नी उज्वला यांचे विरुद्ध पिडीत आरोग्य सेविकेने तक्रार केली आहे.आरोग्य सेविकेच्या फिर्यादीने तक्रार असलेला शिक्षक कमलाकर धुळगुंडे याच्या विरोधात भा.द.वी. कलम ३५४ ( १ )( एक ), ३५४ अ( १ ) ( चार ), ३४१,५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवला असून म्हसळा पोलीसानी त्याला अटक केली आहे.पुढील तपास सपोनि प्रविण कोल्हे याच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. शामराव कराडे हे करीत आहेत.
घटना क्रमानुसार नाक्यावरील चर्चा
१)तक्रारदार शासकीय सेवेत व सुशिक्षीत असूनही गुन्हा घडल्यावर पोलीसांत तक्रार न करता पंचायत समिती प्रशासना कडे प्रथम तक्रार का केली?
२) पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी यानी तब्बल २० दिवसात कर्मचारी महीलेला न्याय का दिला नाही.?
३) सातत्याने विविध वृत्तपत्रांतून या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार व राज्य सरकार अशा गुन्ह्यांसाठी विविध कायदे करत असताना घटनेचे गांभीर्य ओळखून म्हसळा पोलीसानी स्वताच फिर्यादी होणे आवश्यक होते. अशी खुली चर्चा आहे.

Post a Comment