विजेच्या गडगडाटासह म्हसळ्यात पर्जन्य वृष्टी..

खरसई येथील शेतकरी चंद्रकांत धुमाळ यांच्या शेतातील नाचणी पिकाचे जंगली श्वापदानी नुकसान केले आहे आजच्या पावसाने नाचणीला कोंब येण्याची शक्यता आहे . 


संजय खांबेटे :  म्हसळा प्रतिनिधी 
म्हसळयात दि. ३०/०९/२०१८ सायं ५ च्या दरम्यान विजेच्या गडगडाटासह पर्जन्य वृष्टी झाली वातावरणात उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही - लाही होत असतानाच थोडया प्रमाणांत पाऊस शिंतडल्याने हवेत गारवा आला . हळवी शेती व नाचणीची पिके तयार असणाऱ्यांना जास्त पाऊस झाल्यास नुकसान होऊ शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तालुक्यात २२०५ हेक्टरवर भात पिक व ३८७ हेक्टरमध्ये नाचणी पिक घेतले जाते तालुक्यात हळवी नाचणी पिक तयार असून रानडुक्कर व माकडे केलटी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान करतात . शेतांत आडवे झालेल्या नाचणी पिकाला या पावसाने कांब येण्याची शक्यता रेवली . बनोटी , खरसई , खामगाव , रोहीणी भागातील शेतकच्यानी वन व कृषी विभागाकडे केल्या आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा