प्रतिनिधी पनवेल
2 आँक्टोबर, गांधी जयंती निमित्त , मुंबई युनिव्हर्सिटी एन्. एस्. एस्. युनिट आणि अनुव्रत फौंडेशनने Art Against Addiction आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मुंबईतील एकूण 251 विद्यार्थी सहभागी झाले होते. 'व्यसनमुक्ती' या विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर आणि संदेशात्मक चित्रे रेखाटली . या सर्व चित्रांमधून सर्वोत्कृष्ट पाच चित्रांची निवड करण्यात आली. यामध्ये न्यू पनवेल मधील सी के टी विद्यालयाच्या कुमारी अदिती प्रकाश पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तीला प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख रु. 3000/- देऊन गौरविण्यात आले. ह्या तिच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक , यांनी तीचे खास कौतुक केले आहे.

Post a Comment