संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
नोव्हेंबरमध्ये राबविण्यात येणार्या गोवर रूबेला लसीकरण मोहिमेव्दारे जिल्ह्यातील जवळपास ८ लाख बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत असून सर्व संबंधित यंत्रणांनी झोकून देवून यात काम करावे, असे आवाहन रॅपीड रिस्पाॅंस टिम WHO सदस्य डॉ गणेश नायर यानी म्हसळा येथील कार्यक्रमांत केले व जिल्हयातील शिक्षण , आरोग्य , विविध N. G.0 महिला बालकल्याण व सर्वच विभागातून मिळणाऱ्या सहकार्यातून जिल्हयाचे उद्दीष्ट १०० % साध्य करणार असे सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ .सूरज तडवी, खामगांव येथील वैद्यकिय अधिकारी डॉ . सुहास मोरे , डॉ. प्रशांत गायकवाड , डॉ. विनय डांगे,श्री गुलाब चव्हाण ,सांख्यिकी पर्यवेक्षक ,श्रीमती विजया पाटील PHN रायगड जिल्हा परिषद अलिबाग, पं.स.आरोग्य विस्तार अधिकारी हिंदोळा , ता. आरोग्य विभागाचे तांडेल , परिचारीका, आशा कार्यकरत्या उपस्थित होत्या.
लहान मुलांना होणारा गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. सरकारने 2020 पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. याअंतर्गत राज्यात नोव्हेंबर महिन्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम १४ नोव्हे २०१८ ला सुरु होणार असून ५ आठवडे चालणार आहे.
तालुक्यांतील सर्व शाळांमध्ये पहिल्या 2-3 आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतील. त्यानंतर उर्वरीत 35-40टक्के लाभार्थ्यांचे गोवर रुबेला लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमित लसीकरण, उपकेंद्र येथे करण्यात येईल. या लसीकरण मोहिमे अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन दिले जाईल.
डॉ. सूरज तडवी. तालुका आरोग्य अधिकारी म्हसळा

Post a Comment