संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
शिवकृपा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्थेच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित संचालक मंडळ व संस्थेचे सदस्य (शेअर होल्डर) यानी पतसंस्थेच्या | विविध आर्थिक धोरणाचे कौतुक करताना ग्रामिण भागात आपली सामाजिक बांधीलकी जपत करत असलेले कार्य कौतुकाचे आसल्याचे बहुतांश सदस्यानी सार्वजनिक वाचनालयाचे हॉल मध्ये पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत मत व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन शैलेश शेट पटेल यांचे अध्यक्षते खाली झालेल्या सभेला व्हाईस चेअरमन दिलीप कांबळे, सदस्य महेंद्र पारेख, विश्वनाथ विचारे, प्रसाद पोतदार, मंगेश म्हशीलकर, सौ. सविता कानसे , रेश्मा कानसे, प्रकाश रायकर, रमेश विचारे, ओंकार गिजे व अन्य सदस्य उपस्थित होते. बँकेच्या म्हसळा शाखे व्यतीरीक्त आंबेत शाखा व पाभरे, में दडी, खामगांव व खरसई या कलेक्शन सेंटरचा कार्यभार अत्यंत पारदर्शक आहे. यासाठी सभेने खरसई कलेक्शन सेंटर साठी स्व-मालकीची जागा घेण्यासाठी सर्व साधारण सभेत पाठींबा दिला.व्हाईस चेअरमन दिलीप कांबळे यानी बँकेच्या आर्थिक प्रगती बाबत सभागृहाला माहीती दिली व संस्थेच्या गुंतवणुक दारांचे संस्था हित व सुरक्षितते बाबत पूर्णपणे सक्षम असल्याचे सांगून संध्येबाबत परिपुर्ण माहीती दिली. संचालक ओंकार गिजे यानी संस्थेची प्रगती ही संस्थेची आर्थिक कामकाजाची पारदर्शकता, कार्यकारी संचालक सुजित पोटले व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक काम करण्याची पद्धती, संस्था जपत असलेली सामाजिक बांधीलकी यामुळे झाली आसल्याचे सांगितले. यावेळी म्हसळा, घोणसे, देवघर कोंड, ढोरजे, फळसप, कानसेवाडी, शिवाजी नगर ,पाभरे, मेंदडी या भागांतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यना प्रत्येक रुपये एक हजारची आर्थिक मदत दिली. कार्यकारी संचालक सुजित पोटले यानी सर्व सधारण सभेची प्रस्तावना व संस्थेच्या कामकाजाची परिपूर्ण माहीती दिली.

Post a Comment