म्हसळा येथे संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न


म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालूका नाभिक समाज महिला मंडळातर्फे श्रीं संत महाराज पुण्यतिथी कृष्णा खराडे यांच्या म्हसळा येथील निवासस्थानी साजरी करण्यात आली. नथुराम पवार ,  कदम यांनी श्री. सेना महाराजांचे पुजन केल्यानंतर  दिलीप जाधव यांनी ग्रंथवाचन करून  अर्थ विषद केला.
              आरतीनंतर श्रद्धांजली होऊन कृष्णा खराडे, दत्तात्रेय जाधव , सदानंद कदम , या जेष्ठांचा तसेच या दिवशी जन्म झालेला त्यांचाच पुत्र अर्जुन यांचा सत्कार करण्यात आला.
           सदर कार्यक्रमात दिलीप जाधव , मंगेश कदम यांनी संत सेना महाराजांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
           विद्यार्थ्यांच्या सत्कारात प्रणिता किशोर इंदुलकर , क्षितिजा संदीप जाधव , अर्जून सुशील यादव ,  तनुष्का मंगेश कदम , श्रेया मंगेश कदम यांचा शालोपयोगी वस्तु व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

          सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी म. मंडळाच्या अध्यक्षा  
 वर्षा यादव , उपाध्यक्षा .मेघना कदम , रजनी जाधव, , दिपाली जाधव, खराडे, बडे, पवार इ. महिला सदस्यांनी  तसेच वैभव जाधव , रुपेश पवार , यांनी  विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा