ग्रामपंचायत निवडणुका होणार चुरशीच्या ; म्हसळयातील ५ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी २२ अर्ज , सदस्य पदासाठी १०० अर्ज दाखल


 संजय खांबेटे , म्हसळा
तालुक्यातील मांदाटणे , खारगांव खुर्द, मेंदडी ,कोळे व आंबेत या पाच ग्रामपंचा यतींच्या सार्वत्रिक निवडणुकी च्या थेट सरपंच निवड व सदस्य निवडीच्या अर्ज दाखल करायच्या आजच्या शेवटच्या दिवशी ५ सरपंचपदासाठी २२ अर्ज , ४३ सदस्यांसाठी तब्बल १०० अर्ज दाखल झाले असल्याच तहसीलदार रामदास झळके यानी सांगितले. 

ग्रामपंचायत निहाय आलेले अर्ज पुढील प्रमाणे कोळे सरपंच २, सदस्य १४( ७), मेंदडी सरपंच ६ , सदस्य२४ ( ११), आंबेत सरपंच ५, सदस्य २७ ( ९), मादाटणे सरपंच ४, सदस्य १४( ९ ), खारगांव ( खु ) सरपंच ५ , सदस्य २१ ( ७) (कंसातील आकडे ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संखेचे आहेत.)

उद्या बुधवार दिं.१२ रोजी छाननी आहे.तालुक्यात शिवसेना व काँग्रेस (I) ची युती होण्याचे जवळ जवळ निश्चित आहे , राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप च्या अधाडी जवळ काही ठिकाणी भाजप जवळीक साधण्याचे संकेत आहेत. सद्यस्थितीत मेंदडी, आंबेत व मां दाटणे या तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. कोळे व खारगाव ( खु ) या दोन ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा