मेंडदी:- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व जिल्हा क्रीडा परिषद आणि योगा असोसिएशन ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा येथील पाच गाव अगारी समाज हॉल येथे जिल्हास्तरिय शालेय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला. १४ वर्षे खालील मुले हर्षद रातवडकर,आर्यन शिंदे,तनिश जैन,प्रतीक धुमाळ,रोहन चौहान १४ वर्षे खालील मुली अस्मी गुरव,श्रुतिका गोरीवले,मनाली पाडावे,मेहेक सरखोत,श्रेया जाधव १७ वर्षे खालील मुले आदित्य सवाईसर्जे,ऋषिकेश शिंदे,वैभव चाळके,शिवम बांगर, १७ वर्षे खालील मुली शीतल पयेर,लिजा कोठारी,प्रियंका रमाणे,कल्याणी सालेगावकर,आशा वाघ यांची निवड झाली असून रायगड जिल्ह्याचा संघ मुंबई विभागस्तरीय शालेय योगासन स्पर्धेसाठी रवाना होईल.सदर स्पर्धेसाठी योगा असोसिएशन ऑफ रायगड डिस्ट्रिक्टचे सचिव हेमंत पयेर यांची प्रमुख उपस्थिती लाभली पंच म्हणून अमित रेड्डी,धनाश्री खोत,मंदार चवरकर,आर सी चौधरी,एम पी लोकरे यांनी काम पहिले

Post a Comment