श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
सर्वसामान्य व्यक्तींना सोसावे लागणारे महागाई चे चटके असह्य झाल्यामुळे जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे .इंधनाचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत .सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन अनेक समस्यांनी ग्रस्त झाले आहे.अच्छे दिनाचे स्वप्न हवेत विरले आहे .जनतेला न्याय हवा आहे असे शाबीस्ता अन्सारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताने सांगितले .
भारत बंद चा विरोधी पक्षांनी दिलेल्या आवाजाला श्रीवर्धन मध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले .राजकीय पक्षांचा महिला कार्यकत्यांनी आपआपल्या पक्षाचे शक्ती प्रदर्शन मोर्चा प्रसंगी घडवून आणले. भाजपा प्रवक्ते राम कदम यांच्या व्यक्तव्यांचा निषेध नोंदवणारे फलक महिला कार्यकत्यांनी दर्शवले . श्रीवर्धन मधील वाहतुक व्यवस्था सुरळित पणे चालू होती तसेच जनजीवनावर कुठलाच परिणाम जाणवला नाही .शाळा, महाविद्यलय व्यवस्थित पणे चालू होते .श्रीवर्धन शिवाजी चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, मनसे व आय काँग्रेस यांनी एकत्र येऊन मोर्च्याचे निवेदन प्रभारी तहसीलदार वीरसिंग वसावी यांना देण्यात आले. मोर्च्या प्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मोर्च्यात महिला कार्यकर्त्यांनी सहभाग मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे .


Post a Comment