म्हसळा बाबू शिर्के
म्हसळा तालुक्यातील निवडणुकीपूर्वी भांडणांने गाजलेली, संवेदनशील कोळे ग्रामपंचायत मध्ये शिवसेना विभाग प्रमुख अमोल पेंढारी यांच्या कुशल नेतृत्वाने परिवर्तन विकास आघाडीने एकहाती सत्ता स्थापन केली आहे.एकूण सात सदस्यांपैकी सरपंच सहीत पाच सदस्य परिवर्तन आघाडीचे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी विधानपरिषद मध्ये आवाज उठवला होता.त्यानंतर सरपंच अमोल पेंढारी यांच्यावर कारवाई सुद्धा झाली होती. या ग्रामपंचायत निवडणुकी पूर्वी बरेच वाद सुद्धा झाले होते.आणी राष्ट्रवादीचे विभाग अध्यक्ष सतीश शिगवण यांनी हि ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी बरेच प्रयन्त केले परंतु जनतेने त्यांना नाकारून पुन्हा परिवर्तन चे अध्यक्ष सूर्यकांत विचारे , महेंद्र विचारे, मावळते सरपंच अमोल पेंढारी यांच्यावर विश्वास टाकून ग्रुप ग्रामपंचायत कोळे ची सत्ता परिवर्तन आघाडीच्या ताब्यात दिली. या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी परिवर्तन आघाडीच्या देवका जाधव या भरघोस मतांनी जिंकून आल्या तर मनीषा डिंगणकर, अमोल पेंढारी, राजेंद्र मोहिते, प्रमोद जाधव, सुजाता बांद्रे हे परिवर्तन आघाडी कडून आणी निरमा राणे, शारदा विचारे हे दोन सदस्य राष्ट्रवादी पुरस्कृत पंचक्रोशी आघाडीतून विजयी झाले.

Post a Comment