म्हसळ्यात डेंग्यूच्या रुग्णांची शतकाकडे वाटचाल : प्रसिद्ध डॉक्टर, नर्स साहित नव्वद जणांना लागण : नगरपंचायतीच्या शुन्य नियोजनामुळे नागरीकांना रोगराईचा फटका


म्हसळा ( निकेश कोकचा )

म्हसळा शहरासहीत तालुक्यातील तब्बल नव्वद जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामध्ये शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर व ग्रामिण रुग्णालयातील एका नर्सला देखील डेंग्यूची लागण झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. म्हसळा नगरपंचायत व आरोग्य विभागामार्फत अद्याप कोणतीही खबरदारी बाळगली गेली नसल्याने डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या शतकाकडे जाताना दिसत आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णामध्ये मुंबई येथून गणपती सणा निमित्त आलेल्या चाकरमाणींची संख्या जास्त असल्याची माहिती एका खाजगी पथॉलोजी चालकाने दिली. मात्र म्हसळा नगरपंचायत व आरोग्य खात्यामार्फत योग्य खबरदारी बाळगली गेली नसल्याने स्थानिकांमध्ये देखील डेंग्यूची लागण झपाट्याने पसरत आहे. डेंग्यूची लागण झालेल्या गावांमध्ये प्रामुख्याने म्हसळा शहर, खारगाव खुर्द, मेंदडी, वारळ व तुरूंबाडी या गावांचा समावेश आहे. म्हसळा शहरामध्ये नियमित गटार सफाई न करणे, मच्छर फवारणी वेळेवर न करणे, सांडपाण्याची विल्हेवाट न लावणे व नागरीकांना खबरदारी घेण्यासाठी फलक न लावणे यामुळे शहरातील डॉक्टरांना व नर्सना देखील डेंग्यूची लागण झाली आहे. रोगांवर निदान करणाऱ्या डॉक्टरांनाच जर नगरपंचायतीच्या आरोग्य बाबतच्या नियोजना अभावी व ढसाळ कारभारामुळे आजारी पडावे लागत असेल तर शहरातील सामान्य जनतेमध्ये नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे किती रोगराई पसरली असेल याचा शोध घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा