संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारळ व शहरातील नवे नगर परिसरांत लागोपाठ घरफोड्या करून चोरट्यानी दहशत निर्माण केली आहे. वारळ येथील अनंत रामचंद्र चाळके यांचे घर अज्ञात चोरट्यानी गुरुवार दि. २७ रोजी सकाळी ९ ते दु.३ चे दरम्यान फोडून रु २ लक्ष रोख व सुमारे १ लक्ष २९ हजाराचे दांगीने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने म्हसळा पोलीसानी गु.र.नं.३२/२०१८ भा.द.वी.४५४ ,३८० प्रमाणे नोंद केली. दुसरी घरफोडी म्हसळा शहरातील नवा नगर येथील असमा अ. सत्तार पंडे यांचे घरात शुक्रवार दि .२८ रोजी पहाटे ३.३० ते ८. ३० च्या दरम्यान खीडकीची ग्रिल तोडून चोरटयानी १ लक्ष ३५ हजार ५०० चा ऐवज लंपास केले. यामध्ये रोख रक्कम मोबाईल, सोन्याचे दागीने असा ऐवज आहे. सदर गुन्ह्याची नोंद म्हसळा पोलीसानी ३३/२०१८ भा.द.वी. ४५७, ३८० ने नोंद केली आहे. गुन्हाचा तपास करण्यासाठी म्हसळा पोलीसानी डॉग स्कॉड अगर अन्य कोणत्याही यंत्रणेचा वापर केला नसल्याचे ठाणे अंमलदार आर.एच. मोहीते यानी सांगितले.
म्हसळयातील ग्रामिण भागात व शहरांत अनेक घरे, फ्लॅट व बंगले बंद असून मालक व्यवसाय व अन्य उद्योगांसाठी परदेशी अगर शहरांतून असतात. त्यामुळे तालुक्यांत चोरटयांची दहशत झाली आहे.

Post a Comment