म्हसळा (निकेश कोकचा )
म्हसळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी चोरीची घटना घडली असुन या चोरीमध्ये चोरांनी ऐंशी हजाराची रोकड, एक सोन्याची बांगडी, दोन मोबाईल व एटीएम कार्ड लंपास केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चोरट्याने रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर येथे एटीएम कार्डचा वापर करीत पैसे काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. म्हसळा शहरातील नवानगर परिसरामध्ये गुरुवार दि. २७ सप्टेबर रोजी रात्रीच्या सुमारास अ. सत्तार पंडे यांच्या घरातील सर्वजण झोपले असल्याच फायदा घेत चोरांनी घरामध्ये प्रवेश केला. चोरांनी घरातून ऐंशी हजार रोख रक्कमे सहित २२ हजार किमतीची सोन्याची बांगडी, ५ हजार किंमतीचे दोन मोबाईल व रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर येथून एटीएम मधून ३० हजार रुपये काढले असून एकून १ लाख ३५ हजार रुपयांची चोरी झाली आहे. म्हसळा तालुक्यातील वारळ येथिल चोरीची घटना ताजी असतानाच सलग दुसरी चोरी करुण चोरांनी पोलिसांना आव्हानच केले आहे. म्हसळा शहरातील चोरीनंतर व्यापारी व सामान्य जनतेमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी रात्र गस्ती वाढवावी अशी मागणी पुढे येत आहे. असमा अ. सत्तार पंडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण म्हसळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूदध् गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी प्रविण कोल्हे हे करित आहे.

Post a Comment