म्हसळा (निकेश कोकचा)
म्हसळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये शिवसेनेचा एकमेव सरपंच समजली जाणारी कोळे ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता मिळवणारी परिवर्तन विकास आघाडीचा कुठल्याही पक्षाची पुरस्कृत संबध नसून सर्वच राजकीय पक्षाशी हितसंबंध ठेऊन स्थानिक पातळीवर सर्वांना सोबत घेऊन जाणारी आघाडी असल्याचे प्रतिपादन परिवर्तन विकास आघाडीचे अध्यक्ष सूर्यकांत विचारे यांनी लेखी पत्रक काढून केले आहे. जे कोणी राजकीय पक्ष आमच्या विभागाचा विकास करतील त्यांचा समवेत चर्चा करून पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात येईल.तसेच आगामी निवडणुकांमध्ये गावागावातील दृष्टिपथामध्ये असणारी विकास कामे करणाऱ्या पक्षाला सहकार्य करण्यात येईल असेही त्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे आता हि ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात नसून स्थानिक आघाडीच्या ताब्यात आहे. तालुक्यात राजकीय समीकरण बदलले असून शिवसेनेला पाच पैकी एकही ग्रामपंचायत जिंकता आली नाह हे या प्रसिदधी पत्रकावरून स्पष्ट झाले आहे.


Post a Comment