श्रीवर्धन : वार्ताहर
श्रीवर्धन बसस्थानकातील समस्या सोडविण्यास प्रशासन हतबल झाले असून स्थानकांतील सावळा गोंधळ सुरूच आहे परतीच्या प्रवासात चाकरमान्यांना झालेल्या त्रासामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे . अनेक बसेसमध्ये आसन व्यवस्था कमी असताना प्रवाशांना बुकिंग दिले असल्याने प्रवाशांची पंचाईत झाली . मात्र या सर्व प्रकाराकडे श्रीवर्धन आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
२० सप्टेंबर रोजी ३ . ३० वा सुटणारी श्रीवर्धन - डोंबिवली - कल्याण शिवशाही बसचे चालक अतिशय मद्यधंद अवस्थेत प्रवाशांना आढळले . चालकाची त्वरीत चौकशी केली असता त्या चालकाने ' मी दारू पिऊनच गाडी चालवितो ' असे प्रवाशांना उत्तर दिले . त्यांची तक्रार कंट्रोलरकडे करण्यात आली . त्यानंतर कल्याण - डोंबिवलीकरीता लाल डब्बा बस लावण्यात आली . मात्र शिवशाही बसला ४३ सिटचे आरक्षण असतानासुध्दा प्रवाशांना लाल डव्याने प्रवास करून आर्थिक भुर्दंड सोसावा लगला आहे . त्याचप्रमाणे चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला . त्याचप्रमाणे ३ . ३० वा , सुटणारी श्रीवर्धन - विरार बसला ३३ सिटचे आरक्षण करण्यात आले होते . मात्र त्या बसमध्ये ३० सिटच उपलब्ध होत्या . त्यामुळे चाकरमान्यांना अरक्षण असतानाही हालअपेष्टा सहन करून वेळेअभावी प्रवास करावा लागला . याबाबत वहातूक नियंत्रक यांच्याकडे देखील प्रवाशांनी तक्रार केली . मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही . श्रीवर्धन बसस्थाकांतील अनेक समस्या कायम असून याकडे आगारप्रमुखांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करून नागरिक अंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे गणपती उत्सवापूर्वी मोहरम , गौरी गणपती सणासुदीच्या दिवसात शांततापुर्ण सण साजरे व्हावेत नागरिकांच्या समस्या , तक्रारी तसेच अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून प्रवर्धन म्हसळा तालुक्यांची शांतता किमटीची संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला दोन्ही तालुक्यांतील मान्यवर नागरिक उपस्थित होते . या सभेत प्रमुख्याने , विज रस्ते , परिवहन वाहतुकीचे मुद्दे गाजले होते परिवहन संदर्भात नागरिकांनी अनेक प्रश्न विचारून नागरिकांनी आक्षेप घेतला . होता त्यावेळेस श्रीवर्धन प्रांत अधिकारी यांच्या वतीने नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या होत्या . मात्र श्रीवर्धन आगार व्यवस्थापकांनी कोणतीही दखल घेतल्याचे दिसून येत नाही .

Post a Comment