आंबेत येथील " शिवस्मारकाला" वंदन करून कॉंग्रेस (आय) व शिवसेनेच्या उमेदवारानी केली प्रचाराला सुरवात.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
   आंबेत ग्रामपंचायतीची निवडणुकीतील रंगत वाढत असून कॉंग्रेस (आय) व शिवसेनेच्या उमेदवारानी आंबेत येथील श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाला व माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुलेच्या कबरस्थानाला वंदन करून आर्शीवाद  घेतले. आंबेत ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस (आय) च्या उमेदवार अफरोजा नाजीम डावरे व युतीचे पॅनल निवडून आणण्याचे स्थानिक ग्रामस्थाना अवाहन केले. यावेळी शिवसेनेचे अंधेरीचे उपविभागप्रमुख प्रमोद सावंत , इकबाल ठोकण, राजू सावंत, फारुक उभारे,अमानुल्ला झटाम, अकलाख डावरे, पांडुरंग आंबेकर, समीर वाईकर, रमेश सावंत व सर्व उमेदवार उपस्थित होते. प्रचार फेरीत आंबेत मोहल्ला, सावंत आळी, बौद्धवाडी अशा तीनही प्रभागांतून प्रचारात आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचा मुलगा नावीद अंतुले प्रचारांत विशेष  सक्रीय  झाल्याने रंगत वाढली असल्याची चर्चा  स्थानिकांच्यात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा