श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रेम, आपुलकी, स्नेह व निकोप दृष्टीकोनाची आवश्यकता आहे .समाजातील प्रत्येक घटकातील समनव्य व संवाद देश प्रगतीत महत्वाचा आहे.जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद द्वारे राष्ट्रीय सुरक्षेस बळकटी प्राप्त होते .असे प्रतिपादन धर्मराज सोनके यांनी नानवेल येथे केले .
श्रीवर्धन तालुक्यातील नानवेल येथील काळभैरव मंदिराच्या प्रांगणात 'जनता व पोलीस प्रशासन संवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी धर्मराज सोनके यांनी उपस्थित नानवेल ग्रामस्थांना संबोधित केले.
समाजातील जातीय विषमता समाजास प्रगतीपासून दूर ठेवते .लोकशाही ने सर्वांना समान हक्क दिले आहेत. समाजातील सर्व स्थरात लोकशाही मुल्यांची रुजवणूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील ताणतणाव कमी होईल. आपले प्रत्येक सण व उत्सव आपण सरकारी नियमांचे पालन करून करणे निश्चितच फायद्याचे आहे .समाजात सर्वत्र ऐक्याची भावना निर्माण करण्याचे काम उत्सवा करतात.नानवेल हे लहान गाव असले तरी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या कारणे स्थानिक जनतेच्या सहकार्याने किनाऱ्यावर होणाऱ्या सर्व हालचालींचे यथार्थ व अचूक माहिती सुरक्षा दलास मिळणे शक्य आहे.किनाऱ्यावरील वास्तव्य करणारा प्रत्येक नागरिक हा देशाचा सैनिक आहे .समाजात तेढ निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे .ग्रामीण भागातील समाज हा रूढी प्रिय असतो .परंतु समाजात अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार नाही याची काळजी घ्यावी .समाजातील प्रत्येक घटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे .असे धर्मराज सोनके यांनी आपल्या मनोगतात म्हंटले .
सदरच्या कार्यक्रमास नानवेल चे सरपंच चंद्रकांत नाक्ती ,
कांशीराम हांडे, दिनेश नाक्ती ,अर्चना गोरीवले , सुजित हांडे ,यशवंत पाटील ,परशुराम गोरीवले ,जयेश भोपी ,पोलीस कर्मचारी निलेश सोनवणे ,संदीप सावंत व नानवेल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment