म्हसळ्यात जुगार अड्डयावर धाड...


( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहरातील कुंभार वाडा परीसरात जुगाराचा आड्डा सुरु आसल्याची पोलीसाना खबऱ्याकडून माहीती मिळताच पोलीसानी गणेश वसंत बिरवाडकर व अन्य ७ जणांवर कारवाई केल्याचे सांगितले.  फिर्यादी नामदेव रामकिशन जाधव यानी गु.र.नं. ३० / २०१८ जुगार अधिनियम १८६७ कलम १२ अ प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे तपासी अमलदार पो.ना.एस.एन. जाधव यानी सांगितले. गणेश बिरवाडकर व अन्य ७ जण आपल्या घराचे शेजारील रिकाम्या जागेत जुगार खेळत असताना पहाटे ३ च्या दरम्यान घाड टाकण्यात आली , त्या वेळी रू ९ हजार ५०० ची रोकड व दोन कॅट असा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा