श्रीवर्धन प्रतिनिधी
आगामी येणार्या श्रीवर्धन तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका शेतकरी कामगार पक्ष संपूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे आमदार पंडीत पाटील यांनी केले . ते श्रीवर्धन जीवना येथे आले होते . यावेळी बोलताना त्यांनी पुढील दिशा स्पष्ट केल्या . श्रीवर्धन तालुक्यात शेकापची ताकद वाढत असून बोर्ली गणातून तरुण मोठ्या संख्येत सामील होत आहेत . यावेळी त्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील गावातील विविध विकासकामांबद्दल चर्चा केली तर थोड्याच दिवसात जिल्हा नियोजन मंडळ व विविध योजनेतून विकासकामांचे भूमीपूजन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले . यावेळी तालुका चिटणीस वसंत यादव , पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विश्वास तोडणकर , अमित पाटील , सुनील पांगारे , अनिल पांगारे , अंन्सार चोगले , चंदूअप्पा धनावडे , बंधू खोत , उत्तम दिवेकर , शरद भाटकर , अनिकेत पांगारे , मनोहर कांबळे , गणेश कांबळे , विनोद हेकर , आदी शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment