संजय खांबेटे : म्हसळा- प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील ग्रंथालय आणि सेवक यांच्या शासकीय मागण्या गेली अनेक वर्षे पुर्ण न झाल्यामुळे एक दिवसाचे धरणे आंदोलन बुधवार दिनांक 19/9/2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे करण्यात येणार असल्याचे रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख श्री नागेश कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे जिल्ह्यातील तालुका ग्रंथालयाना कळविले आहे.ग्रंथालयाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने आंदोलन यशस्वी करण्याकरिता ग्रंथालयाचे सर्व सेवक,संचालक मंडळ आणि वाचक, हितचिंतक वर्ग या एक दिवशीय आंदोलनात सहभागी होणार आहेत.आंदोलनाचे दिवशी रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय बंद ठेवण्याचे आवाहनही जिल्हा ग्रंथालय संघाने केले आहे.

Post a Comment