संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
आठ गावे आणि दोन वाडीवस्तीची तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना गेली 15 दिवसांपासुन नादुरुस्त आहे.तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजना वर्षभरात सुरू कमी व बंद जास्त अशी असते या योजनेवर शासनाने कोट्यावधी खर्च व लाखो नी रिपेअर वर खर्च करूनही ही योजना सतत बंद पडत असल्याने ती ठेकेदार व प्रशासनाने संगनमताने
थकवली असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुरुस्तीचे काम चालु आहे हेच उत्तर नेहमी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अधिकारी आणि संबंधित ठेकेदार ग्रामस्थांना देत असतात.मागील 15 दिवस सदर योजनेचा पाणी पुरवठा बंद पडला आसुन लिकेज सापडत नसल्याचे कारण सांगून ऐन गणपती सणासुदीला गावागावात आलेल्या चाकरमानी प्रचंड नाराज झाले आहेत.
चार दिवसांत तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत न केल्यास आठ गावे आणि दोन वाडीवस्तीवरील नागरिक आंदोलन करणार असल्याचे लेखी पत्र म्हसळा नायब तहसीलदार के .टी. भिंगारे यांचे कडे तोंडसुरे नळ पाणी पुरवठा कमिटीचे अध्यक्ष तथा माजी सभापती महादेव पाटील यांनी दिले आहे या वेळी त्यांचे समावेत माजी सरपंच मनोज नाक्ती, भिकु पाटील,तुकाराम पाटील,गजानन जंगम,महादेव जंगम,नौशाद शिरशिकर,श्री भायदे,माजी सरपंच नारायण नाक्ती,बाबु जंगम आदि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.आठ गावे आणि दोन वाडी करिता तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजना तत्कालीन युती शासनाच्या कालावधीत मंजुर करण्यात आली आहे सदरची योजना सुरवाती पासुनच योग्य नियोजना अभावी अनेक वेळा नादुरुस्त असते या योजनेवर अनेक वेळा लाखो रुपये खर्च करूनही योजना वेळोवेळी बंद पडत असल्याने खारगावखुर्द, सकलप, तोंडसुरे, जंगमवाडी, बौद्धवाडी, बनोटी,रेवळी,वरवठणे,आगरवाडा,पे डांंबे,वरवठणेकोंड येथील 10 हजार लोकवस्ती मधील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.योजनेच्या संबंधीतानी येत्या चार दिवसांत सदरची योजना पुर्ववत सुरू केली नाही तर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment