श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
राष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने श्रीवर्धन तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे .1992च्या कटू आठवणी मन विदीर्ण करतात .सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील तालुक्यात श्रीवर्धन चा समावेश होतो. आजमितीची श्रीवर्धन ची लोकसंख्या व पोलीस ठाण्यातील कार्यरत कर्मचारी वर्ग यांच्या संख्येचे गुणोत्तर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या 85040 च्या जवळपास आहे .तालुक्यातील पोलीस ठाण्यात एकूण कर्मचारी संख्या 87 आहे .तालुक्यातील 977 व्यक्तीच्या सुरक्षेसाठी अवघा एक पोलीस कर्मचारी उपलब्ध होत आहे. जागतिक सुरक्षेच्या नियमानुसार साधारणतः 270 लोकांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस असा नियम आहे .महाराष्ट्र राज्यात 300 ते 350 लोकांच्या पाठी एक पोलीस कार्यरत आहे. तालुक्यात श्रीवर्धन शहर व( दिघी सागरी) बोर्लीपंचतन येथे पोलीस ठाण्यात
-श्रीवर्धन मंजूर संख्या 04 अधिकारी + 51कर्मचारी
प्रत्यक्षात हजर पोलीस अधिकारी 02 प्रत्यक्ष हजर पोलीस कर्मचारी 36 आहेत.त्या पैकी रजा :गैर हजर 02 वैद्यकीय रजा 02प्रसुती रजा 01 शिल्क 32 होय.अत्यावश्यक कामगिरी करीता नेमण्यात येणारे संख्या 27 तर शिल्लक फक्त 05 व बोर्लीपंचतन येथे 02 अधिकारी व 30 कर्मचारी आहेत .दोन्ही पोलीस ठाण्यात तील एकूण कार्यरत कर्मचारी संख्या 87 होते .
श्रीवर्धन च्या लोकसंख्याचा विचार करता पोलीस यंत्रणेचे मनुष्यबळ फारच कमी असल्याचे आहे .
श्रीवर्धन तालुक्यात दोन वर्षा पासून विविध गुन्ह्यांची मालिका जोर पकड़त आहे किरकोळ गुन्हासोबत गंभीर गुन्ह्यांत दिवसांन दिवस वाढ होत आहे त्या कारणे समाजातील सर्व घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले निदर्शनास येते. प्राप्त माहिती नुसार सन जानेवारी 2016ते जुलै 2017 या दरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील घडलेले गुन्हे
सन 2016 गुन्हे अहवाल
दाखल उघड
खून 01 01
घरफोडि 08 04
चोरी 03 02
फसवणूक 03 02
पळवून नेणे 01 01
दुखापत 04 04
हाणामारी 03 03
विनयभंग 04 04
अपघात 01 01
जुगार 06 06
दारूबंदी 38 38
ईतर 12 10
जुलै 2017 पर्यंत
खून 01 01
रेप 01 01
चोरी 03 03
मारामारी 08 08
किरकोळ 04 04
विनय भंग 02 02
अपघात 02 02
ईतर 17 08
जुगार 02 02
दारूबंदी 22 22
श्री वर्धन पोलिसांनी 148 घडलेल्या गुन्हापैकी 131 गुन्हे उघड केले.उर्वरित 18 गुन्ह्यांचा शोध चालू आहे.
तालुक्यातील अपुऱ्या मनुष्यबळात व्हीआयपी सुरक्षा, मोर्चे, आंदोलने, सण उत्सव,उपोषणे व गुन्हे तपास करतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.श्रीवर्धन ची आजमितीची लोकसंख्या, भौगोलिक स्थान व पोलीस कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक क्षमता यांचा विचार करून विद्यमान राज्यसरकार व पोलीस प्रशासनाने योग्य विचार करणे अगत्याचे आहे .तसेच सागरी सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे भविष्यसाठी त्रासदायक ठरू शकते.


Post a Comment