दिवेआगर : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर , श्रीवर्धन , दिवेआगर या पर्यटन स्थळातील दिवेआगर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असतानाही येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेकडे मात्र सबंधित विभागाकडून दुर्लक्ष होताना दिसून येत आहे तर बेशिस्त पर्यटकांकडे दिवेआगर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने समुद्रकिनारी एखादा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नसल्याने ग्रामपंचायतीने बेशिस्त पर्यटकांवर योग्यती कारवाई करावी असे बोलण्यात येत आहे . दिवेआगर समुद्रकिनारा हा स्वच्छ व नितांत सुंदर असा असून या समुद्र किनाऱ्यावर तसेच सुवर्ण गणेश मंदिर पाहण्यासाठी नेहमीच पर्यटकांची रेलचेल दिसून येते सध्या पावसाचा जोर कमी असल्याने व सुट्टीच्या दिवसात दिवेआगर येथील समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरत आहे समुद्रकिनारी मनमुराद आनंद लुटण्यासाठी आपल्या लहान मुलांना तसेच वृद्ध पालकांना घेऊन पर्यटक येथे येत असतात तर काही बेशिस्त पर्यटक ग्रामपंचायतीचे नियम पायदळी तुडवून भरधाव वेगात आपल्या गाड्या घेऊन येतात तसेच समुद्रकिनारीच पर्यटक आपल्या गाड्या ठेवत आहेत तर काही पर्यटक मद्यधुद अवस्थेत ही दिसून येत आहेत तसेच मद्यधंद अवस्थेत पर्यटकांकडून धिंगाणा घालून स्थानिकांना त्रास दिल्याच्या घटना घडल्या आहेत तर दिवेआगर ग्रामपंचायतीकडून समुद्रकिनारी सुरक्षा फलक तसेच सीसी टिव्ही कॅमेरे लावण्यात आले असले तरी काही बेशिस्त पर्यटक ग्रामपंचायतीच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत समुद्रकिनारी भरधाव गाडी चालवल्याणे गाडीवरी ताबा सुटून समुद्रकिनारी खेळणारी लहान मूले , पर्यटक तसेच स्थानिक यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी तसेच समुद्रात गाड्या लावल्याने भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाहून अतिउत्साही पर्यटकांच्या गाड्या पाण्यात फसत असण्याच्या घटनेत ही वाढ होताना दिसून येत आहे

Post a Comment