वाळवटी मधील सरपंचांच्या राजीनाम्याची मागणी


श्रीवर्धन : प्रतिनिधी
वाळवटी ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या बातमी नंतर श्रीवर्धन तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . या घटनेनंतर तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायती मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे वाळवटी ग्रामपंचायती मध्ये अनेक आर्थिक व्यवहार व करण्यात आलेली कामे नियमबाह्य पध्दतीने करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्या मुळे नैतिक जबाबदारी म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंच रिजवाना कमरुद्दीन घरटकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा देण्याची मागणी श्रीवर्धन तालुका भाजप अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष व वाळवटी गावाचे रहिवासी अनवर अली अहमद उंड्रे यांनी केली आहे . या प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी यासाठी उड्रे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देणार आहेत . सदराचे प्रकरण तातडीने कोकण आयुक्त यांच्या कडे सुनावणीसाठी पाठविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे उंड्रे यांनी सांगितले आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा