घुममध्ये २५ लाखांचे बंधारे गेले वाहून : माहितीच्या अधिकारात बंधाऱ्यांची माहिती उघड ; कृषी विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील म्हसळा तालुक्यात अनेक गावागावात वेगवेगळ्या शासकीय विभागांमार्फत करण्यात आलेली विविध प्रकारची विकासकामे बोगस व निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत . म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत घुम - रुद्रवट हद्दीतील मौजे घुम ( घुमेश्वर या गावातील नद्यांवर सन २०१३ - १४ मधे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत २५ लाख रुपये खर्चाचे बंधारे बांधणे हे काम मंजूर करण्यात आले होते . घुम येथील नदीला स्वयंभू श्रीघुमेश्वर मंदिर येथे घोले भावकीच्या बागेजवळचा पाणी , स्मशानभूमी शेजारी पळणीचा पाणी , किरकोचा पाणी आणि पऱ्याचा पाणी अशा चार ठिकाणी सदर मंजूर रकमेचे एकूण ४ बंधारे बांधण्यात आले होते परंतु बंधारे बांधताना नदीतल दगड गोटे व इतर तकलादू साहित्य वापरून निकृष्ट दर्जाचे काम केल्याने चारही बंधारे अवघ्या तीन वर्षाच्या काळातच मोडकळीस येऊन वाहून गेले आहेत . बंधारे बांधण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करून काहीच फायदा झाला नाही या भागात पूर्वी असलेला पाणी साठा कमी झाला असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत . केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे . तसेच हे गैरव्यवहार व भ्रष्टाचार अनेक वेळा काही सामाजिक कार्यकत्यांनी उघडकीस आणलेले असतानाही बऱ्याच वेळा हे भ्रष्टाचाराचे प्रकरण राजकीय दबावामुळे आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकार्यांबरोबर ठेकेदारांचे साटेलोटे असल्याने अनेक प्रकरण दाबले गेले असल्याचा आरोप नागरीकांकडून होत आहे तालुक्यातील अधिकारी व ठेकेदारांना प्रत्येक कामात गैरव्यवहार करून भ्रष्टाचार करण्याची जणू काही कीड लागली असून एक प्रकारे ही सवयच झाली असल्याचे बोलले जात आहे . असेच विविध शासकीय विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून केलेला भ्रष्टाचार निकृष्ठ दर्जा व बोगस कामचा नमुना तालुक्यातील धुम गावात माहितीच्या अधिकाराखाल सामाजिक कार्यकर्ते व घुम गावचे सुपुत्र प्रमोद केशव घोले यांनी उघडकीस आणला आहे 

पाणी अडवा, पाणी जिरवा संकल्पना फेल... 
कृषी विभागाच्या अधिकार्यांनी नेमलेल्या ठेकेदारांनी बांधलेले बंधारे जसे वाहून गेले तसे शासनाने मंजूर करून दिलेले २५ लाख रुपये देखील पाण्यात वाहन गेले असून महाराष्ट्र शासनाची पाणी अडवा , पाणी जिरवा ही संकल्पना फेल ठरली असल्याची वस्तुस्थिती थुम गावातील बंधाऱ्यांच्या आजच्या भीषण परिस्थितीवरुन पहावयास मिळत आहे.

जिल्हा कृषी विभागाचे दुर्लक्ष...
बंधारे बांधताना आजूबाजूला जमिनी असणार्या शेतक - यांना बागायतदारांना विचारात घेतले गेले नाही तसेच कित्येक पिढ्यांपूर्वीची बागायती झाडे कृषी खात्याच्या बोगस काम व नियोजन शुन्य कारभारामुळे मेली गेली किंबहुना मारली गेली असूनही आजपर्यंत संबंधित एकाही बागायतदार शेतकऱ्याला एक रुपया सुध्दा नुकसान भरपाई मिळाली नाही . त्याचबरोबर वाहून गेलेल्या बंधान्यांची नवीन दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यासाठी म्हसळा तालका कृषी किंवा जिल्हा कृषी कार्यालयातील एकाही अधिकार्याने फिरकूनही पाहिलेले नाही असे शेतकरी व बागायतदार यांनी सांगितले आहे.

बंधारे वाहुन गेलेल्या बाबतची सविस्तर सर्व माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येईल व याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल .
- श्री साळवे , उपविभागीय कृषी अधिकारी महाड 

कृषी खात्यामार्फत बांधण्यात आलेले चारही बंधारे वाहून गेल्याने गावाचे तसेच आमच्या घोले कुटुंबियांचे नुकसान झाले आहे . या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देणार आहे . 
- प्रमोद केशव घोले , सामाजिक कार्यकर्ते

घुम गावातील नदीला कृषी खात्याने बंधारे बांधले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही उलट आमची पिढ्यानपिढ्याची नारळ , सुपारीची बाग मरून गेली . बंधारे बांधताना शेतकन्यांना विश्वासात घेतले नाही व आज पर्यंत काहीही नुकसान भरपाई मिळाली नाही . 
- प्रविण महादेव घोले , शेतकरी

घुम बंधारे वाहन गेल्याची कल्पना नाही परंतु माझ्याकडे लेख तक्रार आल्यास या कामाची संपूर्णपणे योग्य ती चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल .
-श्री . शेळके , जिल्हा कृषी अधिक्षक 


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा