म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यात ८३ गावा मध्ये व वाड्या वस्ती मध्ये आज १०२ गौराई सोबत १०६८ बाप्पांना देखील भावपूर्वक निरोप देण्यात आला . तालुक्यात बाप्पांच्या व गौराईच्या आगमानाने नव चैतन्य प्राप्त झाले होते त्याच्या मध्ये ग्रामण भागात मोठ्या प्रमाणात गणपती मुर्तीची स्थापना करण्यात आली होती . त्याच बरोबर गौराईचे देखोल घराघरात आगमण झाले होते मुंबईकरांची अलोट गर्दा विसर्जनासाठी प्रामुख्यांनी दिसत होती . बापांच्या विसर्जनासाठी पावसाची देखील चांगलच कृपा झाली होती गणपती विसर्जनाम ध्ये तालुक्यात कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये त्यासाठी म्हसळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी गौरी गणपती विसर्जनासाठी तालुक्यातील गावागावामध्ये पोलस बंधोबस्त तैनात ठेवले होते . गणपती स्थापणे पासून कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही आणि तो घडू नये त्यासाठी २५ पोलस कर्मचारी व २ अधिकारी यांचा कटाक्षपणे लक्ष देत होते . त्यामध्ये स्वराज्य नागरी संस्थेच्या ग्रामपंचायती ठिकाणी आहेत . त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त होता . त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अचूक पणे सुरु असल्याने तालुक्यातील जनता पोलिसांविषयी समाधान व्यक्त करत आहेत त्याच बरोबर तालुक्यात गणपती विसर्जना साठी कुठेही डिजे दिसला नसल्याचे वृत्त संबधीत प्रशासनाने सांगितले आहे . त्या मुळे वर्षांचा गणपती बाप्पा विना थर्माकोल विना डिजे सर्वांनाच पाहण्यास मिळाला .

Post a Comment