दांडगुरी : श्रीकांत शेलार
गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षा लवकर या , असा जयघोष करत बोर्लीपंचतनसह श्रीवर्धन तालुक्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पाला व गौरीला भावपूर्ण निरोप देण्यात आला . यावेळी ठिकठिकाणी ग्राम पंचायतने भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली होती . विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला . गणेश चतुर्थाला वाजत गाजत घरोघरी गणराय विराजमान झाले . सोमवारी विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाष्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला . गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षा लवकर या , गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला , असा जयघोष करत भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला . दिघी सागरी पोलिसांच्या हद्दीत अडीच हजार पाच दिवसांच्या गणेश मृत्याचे विसर्जन झाले प्रत्येक गावाच्या नदी ठिकाणी विसर्जन घाटावर विसर्जन केले जाते तर दिवेआगर सह अनेक ठिकाणी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जित केल्या . माहेरपणासाठी आलेल्या गौराईचे देखोल गणरायासोबत विसर्जन झाले . गणपती पाठोपाठ शनिवारी गौराईच आगमन झालं होत . तीन दिवस या माहेरवाशीणीचे लाड पुरवल्यानंतर आज तिची पाठवणी केली जाते . तर गणपती बाप्पाचेही पाचव्या दिवसाचे विसर्जन करण्यात आले गेल्या आठवड्यात गुरूवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन झाले होते . त्यानंतर दुसच्या दिवशी दीड दिवसाच्या गजाननाचे विसर्जन झाले प्रामुख्याने घरोघरी विराजमान असलेल्या बाप्पाला दीड दिवसानंतर तर काहीजण पाच दिवसानंतर निरोप देतात . विसर्जन करते वेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिघी सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके , उप निरीक्षक पराग लोंढे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस कर्मचारी संदीप चव्हाण , निलेश सोनवणे , राहुल गायकवाड व इतर सर्व कर्मचारी वगनि चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
#Diveaagar #festival #ganeshostva

Post a Comment