लेप ग्रामपंचायती अंर्तगत रस्त्यांसाठी ग्रामस्थ ३ ऑक्टोबरला करणार लाक्षणिक उपोषण ; पंचक्रोषी राष्ट्रवादीत असूनही जिल्हा परिषदेवर नाराजी
( संजय खांबेटे, म्हसळा )
लेप ग्रामपंचायतींतील वाघाव, वाघाव बौध्द वाडी, कळकीचा कोंड, गौळवाडी, लेप मुळगांव, आदीवासी वाडी व वांगणी या सर्व गाव-वाडयाना जोडणारा नवशी, वाघाव, लेप हा ग्रामिण मार्ग ३५ रस्ता गेले ४६ वर्षे अपूर्णावस्थेत आसल्याचा दावा
लेप चे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी अंकुश खडस व त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे.आमच्या मागण्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात असूनही जिल्हा परिषद दुर्लक्ष का करते हेच कळत नाही यासाठी बुधवार दिं .३ ऑक्टोबर रोजी पंचक्रोषीतील ग्रामस्थ तहसीलदार कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे लेप चे सरपंच अंकुश खडस यानी सांगितले.
ग्रामपंचायत हद्दीचे सुमारे ४ ते१५ कि.मी. परिघांने राज्य मार्ग ९९ व राज्य मार्ग ९१ हे अतीशय सुसज्ज असे रस्ते आहेत. त्याना लेप ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामिण मार्ग ११६ जोडला तर ग्रामपंचायतीतील काही वाडयाना दळण वळणा साठी सुकर मार्ग तयार होणार आहे. यासाठी ग्रामिण मार्ग ११६ अपग्रेडेशन करून जिल्हा परिषदेकडून सार्वजनीक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा ही स्थानिकांची आग्रही मागणी आहे, गेले अनेक वर्षे ह्या मागणीकडे जिल्हा परिषद दुर्लक्ष करीत आसल्याचा आरोप खडस यांचा आहे.
माणगांव व म्हसळा तालुक्यातील अनेक खडतर मार्गावरील रस्ते शासनाने पूर्ण केले, त्यामध्ये वाकी -हरखोल- गोवल, हरखोल्- घोडेधुम -सिलीम, गोरेगाव- कुमशेत- मांजरोणे, पुरार फाटा- खामगांव, आंबेत शिर्केताम्हणे -कासर मलई हे सर्व रस्ते अवघड वळणे, प्रचंड चढ उतार असुनही झाले . मग स्थानिक लोकप्रतिनिधीं व जिल्हा परिषद प्रशासनाचे आमच्याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे.
राज्य शासनाने हायब्रीड अॅन्युईटी च्या माध्यमांतून मंजुर असलेला अलिबाग - रोहा- कणघर -वावे रस्त्याला २१५ लक्ष ८ हजार ८०० मंजुर झाले आहेत ते काम तात्काळ सुरु होणे आवश्यक आसल्याचे खडस यांचे मत आहे.

Post a Comment