म्हसळ्यात तलाठी नसल्याने कामे खोळंबली ; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी : स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील शासकीय विभागात काम करणारे अधिकारी वर्ग , क्लार्क कर्मचारी , शिपाई अनेक वेळा कार्यरत असलेल्या सेवेत नागरिकांना योग्य त्या सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत नागरिकांच्या वेळोवेळी तक्रारी सुद्धा येत आहेत . परंतु संबंधित कार्यालयातील तहसीलदार किंवा गटविकास व वरिष्ठ अधिकारी या कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचारी वर्गावर कोणत्याही प्रकारची चौकशी करून कारवाई करीत नाहीत . उलट नागरिकांच्या तक्रारीकडे कानाडोळा करून दुर्लक्षकरीत असल्याची वस्तुस्थिती म्हसळ्यातील सरकारी कार्यालयात पहावयास मिळत आहे . तर विविध सेवा देताना सेवेत कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली असता ते देखील हा विषय गांभीयनि न घेता एक प्रकारे अधिकारी कर्मचारी वर्गाची पाठराखणच करीत असल्याचे दिसून येते . या सर्व परिस्थितीवरून तेरी भी चूप , मेरी भी खूप ही लाजिरवाणी परिस्थिती असून म्हसल्यातील सरकारी यंत्रणेवर संबंधित वरिष्ठ अधिकारी किंवा स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी असे कोणाचेही वचक नसल्याचे दिसून येत आहे तालुक्यातील तलाठी सजांची अवस्था तर दयनीय आहे . अनेक तलाठी हे नेमून दिलेल्या तलाठी सजामध्ये हजरच राहत नसतात तर म्हसळा येथेच तहसीलदार कार्यालयात अडकून पडलेले दिसून येतात त्यामुळे कित्येक किलोमीटर वरून नागरिकांना ७ / १२ दाखला , चतुसीमा नकाशा , किंवा अनेक विविध कामांसाठी म्हसल्यात तहसीलदार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात . त्यामुळे म्हसळ्यात तलाठी नसतात थाऱ्यावर नागरिकांची कामे वाच्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . अशा कर्मचाऱ्यांना नागरिकांना होणा-या आर्थिक व मानसिक त्रासाचे काहीही सोयरसुतक नाही . एकीकडे नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन सेवा सुविधा पुरविण्याचा शासनाचा मानस असून सध्या डिजिटल इंडियाचे वारे वाहत आहेत मात्र म्हसल्यात योग्य अशी नेटवर्क सुविधा नसल्याने अनेक सेवासुविधा ह्या अडचणीच्या ठरत आहेत त्यामुळे डिजिटल इंडियाचे नक्की काय होणार हा नागरिकांना प्रश्न पडला आहे 

म्हसळा तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचा आढावा पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात येईल . तसेच कामात कामचुकारपणा करणाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल . काही लोकांची महसूल विभागाशी संबंधित असणारी अनेक कामे व दीड वर्षभर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे . त्यामुळे या सर्व बाबतीत गंभीर दखल घेतली जाईल.
- संदिप चाचले , उपसभापती पंचायत समिती म्हसळा 

म्हसळा तालुक्यातील सर्व तलाठ्यांना नेमून दिलेल्या आपल्या आपल्या सजामध्ये हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे जर का कोणी आपल्या कामात कसूर करीत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल . 
- रामदास झळके , तहसीलदार म्हसळा 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा